|
धर्नुविद्या क्रीडा प्रशिक्षणासाठी नांदेडच्या नितीन मुंडेची निवड |
|
|
नांदेड दि१७(प्रतिनिधी) नागार्जुना पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची निवड केंद्र शासनाच्या स्पोर्टस अॅथोरिटी ऑफ इंडिया (पश्चिम विभागीय खेळा प्राधिकरणाचे) प्रशिक्षण केंद्रात धर्नुविद्या क्रिडा प्रशिक्षणासाठी नितीन मुंडे यांची निवड झाली आहे फेब्रु२०१० मध्ये पाच राज्यातील खेळाडूंची निवड चाचणी औरंगाबाद येथे घेण्यात आली होती त्यापैकी नऊ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात नागार्जुना पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीतील धर्नुधारी खेळाडू नितीन नागनाथराव मुंडे यंची निवड झाली निवड झालेल्या खेळाडूंना केंद्र शासनातर्फे पोषक आहार, खेळाडूंना लागणारे सर्व किडस व क्रीडा साहित्य तसेच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सदरील केंद्राचे ध्येय जागतिक पातळीवरील धर्नुधारी खेळाडू घडवणे असल्यामुळे सदरील खेळाडूंना राष्ट्रीय धुर्नविद्या क्रीडा संघाचे क्रीडा प्रशिक्षक कुर्मी सीआरयांची मार्गदर्शन लाभले कुर्मी यांनी आतापर्यंत राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील उत्कृष्ट घडविले आहे त्यांनी शासनातर्फे कोरिया येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे सदरील खेळाडूस शाळेच्या क्रिडा शिक्षीका सौशुभांगी देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते सदरील खेळाडूंचे निवड झाल्याबद्दल संस्थेच्या मुख्याध्यापिका सौशैला पवार, संचालक केशव गड्डम, प्रभाकर लखे व सर्व कर्मचारी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत
|