थप्पड की गुंज! गुलाब भावसार काय झाले, महित नाही! पण जणु काही सकाळी सकाळीच माझ्यात अण्णांचा संचार झाला कोणी तरी छातीवर बसून ओम फट्ट स्वाहा म्हटल्याचे तेवढे आठवते तेवढ्यात दूधवाल्याचा आवाज आल्याने बाहेर पडलो, हातात दूधाचे भांडे, दूधवाल्याने माप भरले आणि भांड्यात दूध (चक्क पांढरे पाणी) टाकले काय झाले माहित नाही, आहे ते दूधाचे भांडे बाजूला व्यवस्थित ठेवले आणि दूधवाल्याच्या एका कानफडात (सणसणीत)लगावून दिली मी रोज तुझ्या दूधाची निवळी सहन केली, चक्क ४० रुभाव घेतोस आणि असे दूध देतोस, असा भ्रष्टाचार यापुढे चालणार नाही याद राख! वगैरे वगैरे !! गल्लीतील मंडळी जमा झालेली पाहून दूधवाला बिचारा खाली मान घालून गुपचूप निघून गेला घरात आलो, बायकोनं मीटर बदं केल आणि चक्क शेगडी लावून चक्क दूधाचा चहा करायला ठेवला माझा पारा पुन्हा चढला चक्क बायकोच्या एक थोबाडात ठेवून दिली अग वीजेची शेगडी लावणे हा भ्रष्टाचार आहे, इथून पुढे असा भ्रष्टाचार मला चालणार नाही बायकोने शेगडी बंद केली आणि सज्जड दम दिला, गॅस संपलेला आहे बाहेर जावून हॉटेलातून दोन कप चहा १ कप दूध घेवून या! माझ्या अंगात अण्णा संचारले होते त्यात पुन्हा बायकोचा सज्जड दम नाईलाजाने बाहेरुन चहा, दूध आणले दुपारचा डबा पाहिजे तर गॅस घेवून या! आता नंबर लावून २० दिवस झाले होते गॅस कंपनीवाला आणखी दोन दिवसांनी या म्हणाला पोटात तर कावळे ओरडू लागले, काय करावं अन् काय नाही, काहीच कळेना! तेवढ्यात देव (बीन नवसाचा) पावला एक देवदूत माझी केवीलवाणी अवस्था पाहून म्हणाला, साहेब सिलेंडर पाहिजे का? मी हो म्हणालो! वाटले देव बिन नवसाचा एवढ्या लवकर कसा पावला थोड्याच वेळात उलगडा झाला तो ५०० रुमागत होता कसातरी ४५० रुपयांत सौदा झाला माझे कार्ड त्याने घेतले आणि १० मिनीटात सिलेंडर घेवून तो बाहेर आला दोन दिवस अगोदर सिलेंडर भेटल्याचा खरं म्हणजे मला आनंद व्हायला हवा होता पण आज मात्र तसे झाले नाही त्या माणसाने चांगला सॅल्युट ठोकला अन् त्याने सिलेंडर ५० रु व कार्ड माझ्या हातात जसे दिले तसा माझा राग अनावर झाला सोबत चिरंजीव होते ३० च्या ऐवजी ५० रु रिक्षावाल्याने घेतले मुलाला त्यात बसवले आणि बाहेर आलो त्याने ठोकलेला सॅल्युटने पण माझ्यावर प्रभाव केला नाही मी चक्क त्याच्या एक थोबाडीत मारली तेवढेच माझे समाधान झाले नव्हते, त्याला काय झाले हे समजायच्या आत, मॅनेजरच्या खोलीत गेलो आणि त्याला पण एक थप्पड लगावली सिलेंडर देवून मी का मारले असा त्यााला प्रश्न पडला की नाही माहित नाही काय होतेय कळायच्या आत मोटारसायकल सुरु केली अन् घर गाठले तेथे आलो तर रिक्षावाला माझी वाट पाहत उभा होता त्याने ३० च्या ऐवजी ५० रुघेतल्याचा राग होता मी त्याच्या थोबाडीत लगावून दिली आणि बजावले की, असा भ्रष्टाचार यापुढे चालणार नाही रिक्षावालाच तो, अंगावर धावून आला तोपर्यंत शेजारी जमा झाले आणि आमची हातापाई थांबली आंघोळ केली तेवढ्यात बायकोनं डबा करुन दिला ऑफिसात आलो कामाला लागलो तेवढ्यात एकजण आला, त्याला प्रमाणपत्र हवे होते ते देखील अर्जंट! कागदपत्रे मात्र अपूर्ण होती मी साहेबांकडे त्याला घेवून गेलो त्याची अडचण सांगितली साहेबांनी कशीतरी तयारी दाखविली त्या माणसाला बाहेर बसायला सांगण्यात आले साहेबांनी मला सुचना केली आहे तेवढी कागदपत्रे घ्या, बाकी कागदाचे शपथपत्र घ्या आणि त्याला ५ हजार रुपये पडतील असे सांगा मी त्या माणसाला साहेबांच्या सर्व सूचना तंतोतंत सांगितल्या आजचे आज प्रमाणपत्र ५ हजारात मिळतयं म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला सहजपणे त्याने लगेचच ५ हजार रुपये काढून दिले तो बाहेर गेला, शपथपत्र घेवून आला त्याला त्याचे प्रमाणपत्र मिळाले, साहेबांनी थेट ५ हजार घेतले मी याच आनंदात की, चला एका माणसाचे काम झाले! आपले हात काही त्यात काळे झाले नाहीत तो माणूस प्रमाणपत्र घेवून माझ्याकडे आला आणि साहेब हे ५०० रुघ्या असे म्हणू लागला मी विचार करु लागलो हे ५०० रु घेवू की नका मी तर हे मागितले नाहीत, मात्र हा काळा पैसा (भ्रष्टाचार) थोडाच आहे असे दुसरे मन सांगु लागले सकाळी गॅसला जादा पैसे लागले, रिक्षावाल्याने जास्त पैसे घेतले, मग हे घेतले तर कुठे बिघडले मी मनाचा हिय्या केला अन् पेैसे घेतले! अन् समाधानाचा सुस्कारा टाकला तेवढ्यात एक माणूस मला गदागदा हालवत होता मी ऑफिसच्या टेबलावरच झोपलो होतो आणि तो मला काम सांगत होता मी दचकून माझ्या गालाला आधी हात लावला!! आणि प्रश्नार्थक नजरेने त्यांचेकडे पाहात राहिलो, अन् तो माझ्याकडे!
|