महाराष्ट्रात ३०९७ किमीलांबीच्या महामार्गाची कामे सुरू भुजबळ | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
महाराष्ट्रात ३०९७ किमीलांबीच्या महामार्गाची कामे सुरू भुजबळ प्रिंट ई-मेल
मुंबई, दि५ राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमाच्या विविध प्रकल्पांतर्गत राज्यात २९ हजार कोटी रूपये खर्चाचे आणि सुमारे ३०९७ किमीलांबीच्या महामार्गाची कामे सुरू आहेत हे सर्व मार्ग चार आणि सहा पदरी महामार्ग आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली
राष्ट्रीय रस्ते विकास कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यात अमरावती, धुळे, गुजरात सीमा, खेडनाशिक, नागपूरमध्यप्रदेश सीमा, धुळेऔरंगाबाद, यडशी उस्मानाबाद सोलापूर, सोलापूरआंध्रप्रदेश सीमा या महाराष्ट्र राज्याने प्रस्तावित केलेल्या रस्त्यांचा विचार रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाने केल्याबद्दल भुजबळ यांनी केंद्राचे आभार मानले