|
राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी |
|
|
नांदेड,दि१ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे ५ सप्टेंबर रोजी प्रथमच होत असलेल्या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे
हा सोहळा भव्य दिव्य आणि पारदर्शकपणे करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव इंगोले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हार्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पुरस्कार वितरण सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षानंतर हा सोहळा नांदेड येथे होत आहे पुरस्कारामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक त्याच सोबत सावित्रीबाई फुले पुरस्कारही यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रदान करण्यात येणार आहेत हा पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सुभाष झनक, शालेय शिक्षण राज्य मंत्री फौजिया खान तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे राज्यातील सुमारे १०३ शिक्षकांना सपत्नीक गौरविण्यात येणार असून या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातील सर्वदूर प्रसिद्ध असलेली पैठणी पुरस्काराच्या वेळी प्रदान करण्यात येणार आहे हा भव्यदिव्य सोहळा ५ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ११ वाजता श्रीगुरूग्रंथ साहिब भवन यात्री निवास, चिखवाडीजवळ येथे होणार आहे या सोहळ्यासाठी राज्य शासन, जिल्हा परिषद नांदेड, नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका, मुख्याध्यापक, संघटना, शिक्षक संघटना, संस्थाचालक यांच्यासह दानशूर व्यक्तिंनी या आर्थिक मदत केली आहे या सोहळ्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून ट्रस्टचे अध्यक्ष माध्यमिक शिक्षणाधिकारी राम पवार तर सचिव प्राथमिक शिक्षणाधिकारी शंकर वाघमारे हे आहेत, अशी माहिती सांगून श्रावण हार्डीकर म्हणाले की, हा सोहळा पारदर्शकपणे पार पडवा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत माध्यमिक शिक्षणाधिकारी पवार म्हणाले की, यावेळी राज्यातील १०३ शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे नांदेड उत्तर मतदार संघाचे आ डीपी सावंत म्हणाले की, या सोहळ्याचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कॉपीमुक्ती अभियानाबद्दल प्रातिनिधीक स्वरुपात प्रतिक्रिया उपस्थित व्हाव्यात महापौर अजयसिंह बिसेन म्हणाले की, नांदेड महापालिकेच्या वतीने या सोहळ्यासाठी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे मराठवाड्यातील सर्वत्र प्रसिद्ध असलेली पैठणी आदर्श शिक्षकांना सपत्नीक सत्कार करतांना देण्यात यावी असे त्यांनी सुचविले या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी रामराव पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी शंकर वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य आनंद गुंडीले आदींची उपस्थिती होती |