पंचवंटी हनुमान मंदिराची संरक्षण भिंत न पाडण्याचा मनपाचा निर्णय | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
पंचवंटी हनुमान मंदिराची संरक्षण भिंत न पाडण्याचा मनपाचा निर्णय प्रिंट ई-मेल
नांदेड,दि१ (प्रतिनिधी) वजिराबाद येथील पंचवटी येथील हनुमान मंदिराची संरक्षण भिंत पाडण्यासाठी आलेल्या मनपा पथकाला कडाडून विरोध करुन अतिक्रमण हटविण्याचे काम रोखणाऱ्या सेनाभाजप पदाधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर निर्माण झालेल्या प्रचंड तणावामुळे मनपा अधिकारी व सेनाभाजपचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन भविष्यात पंचवटी हनुमान मंदिर अथवा संरक्षण भिंत हलविण्यात येणार नाही अशी लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
वजिराबाद भागातील १०० वर्षापूर्वीच्या पुरातन हनुमान मंदिराची संरक्षण भिंत असलेली इमारत पाडण्याचे काम आज सकाळी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने सुरु केले हे वृत्त समजताच अॅड दिलिप ठाकूर, पप्पू जाधव, अवतारसिंह पहरेदार यांनी काम रोखले त्यावेळी एमएम ठाकूर यांनी अंगावर पेट्रोल टाकून घेत असताना सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले व अनर्थ टळला अतिक्रमण हटविण्याचे काम थांबविल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला भिंत पाडण्याचे काम रोखणाऱ्या २० पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली ही बातमी पसरताच शिवसेना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली व तणाव निवळावा यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी लक्ष्मीकांत पाटील, पोनि केशव पातोंडे, मनपा सहाआयुक्त संजय जाधव, अतिक्रमण हटावचे गणेश शिंदे यांच्या सोबत तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते पंचवटी हनुमान मंदिर पाडण्याचे कोणतेही प्रयोजन यापुढे राहणार नाही तसेच मंदिराच्या उत्तर भिंतीची इमारत पाडण्यात येईल अशी लेखी हमी दिल्यामुळे तणाव निवळला