गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नॉईज लेवल मिटर | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नॉईज लेवल मिटर प्रिंट ई-मेल
नांदेड,दि१ (प्रतिनिधी) यावर्षीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ठ्य म्हणजे कर्णकर्कश आवाजापासून नागरिकांची सुटका होणार आहे पोलिस प्रशासनाने याबाबत चांगला उपक्रम राबविण्याचे ठरविले असून नॉईज लेवल मिटर बसविण्यात येणार आहे चार प्रकारचे प्रवर्ग करण्यात आले असून ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त ध्वनीक्षेपकाचा वापर करुन ध्वनीप्रदूषण आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे गणेश भक्तांनो सावधान ध्वनी प्रदुषण केल्यास पोलिस कारवाईस सामोरे जावे लागणार यावर्षीच्या गणेशोत्सव, ईद, दुर्गा महोत्सव सणानिमित्त होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणून जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने नांदेड येथे दोन ध्वनी प्रदूषण मोजण्याचे यंत्र (नॉइज लेवल मिटर) सामिल करण्यात येणार आहेत जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत पोलिस अधीक्षक संदिप कर्णिक यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेत ध्वनी यंत्राचे प्रात्यक्षिक किंवा चाचणी घेण्यात येवून यंत्राचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक यांची यावेळी उपस्थिती होती
चार प्रकारांची क्षेत्रवर्गवारी
ध्वनी प्रदूषण नियम २००० अन्वये कलम ३ (१) ४ (१) अनुसार सभोवतालच्या हवेच्या दर्जाची ध्वनीच्या (प्रदूषणाच्या) संबंधातील मानके ठरविण्यात आली आहेत मानकापेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण, ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक अथवा ध्वनी संगीत निर्माण करणाऱ्या वाद्यांंद्वारे अथवा इतर कोणत्याही साधनांद्वारे करेल त्यास कायदेशीर कारवाईस समोर जावे लागणार आहे पोलिस अधीक्षक कर्णिक व अप्पर पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केलेल्या सूचनांनुसार शहरातील सर्व डिजे सिस्टीम धारकांची व शहरातील सर्व उपविभागिय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीत काल मंगळवारी बैठक घेण्यात आली यावेळी नॉईज लेवल मिटर यंत्राचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले