इसापुर धरणाचे १३ दरवाजे उघडले | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
इसापुर धरणाचे १३ दरवाजे उघडले प्रिंट ई-मेल
नांदेड, दि७ (प्रतिनिधी)ः गेल्या चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस ठाण मांडून बसला आहे या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे दरम्यान गोदावरी नदी व तिच्या उप नद्या दुथडी भरुन वाहत आहेतइसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडले असून मनार नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस रविवारी रात्रीपर्यंत होतासोमवारी थोडी उघडीप झाल्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात सर्वदुर पाऊस झाला आहेनांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील मध्यम प्रकल्प विभागाअंतर्गत येणाऱ्या उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प लिंबोटी धरण पहिल्यांदाच ६० टक्के पर्यंत भरत असून पाण्याचा येवा चालू आहेत्यामुळे या धरणातून कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून मनार नदीत पाणी सोडण्यात येणार आहेत्यामुळे नदीकाठच्या गावातील जनतेस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहेनदीकाठच्या जनतेने सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहून आपण व आपली गुरे ढोरे व इतर मालमत्ता सुरक्षित राहील या दृष्टीने उपाय योजना करावी,असे कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग,नांदेड यांनी कळविले आहे
१३ दरवाजे उघडले
इसापूर धरणाच्या वरच्या बाजूने ५१९६६ क्यूमेक्स पाण्याची आवक होत असून धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे ५१९६६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात करण्यात येत आहेधरणाच्या वरच्या बाजूने पाण्याची आवक वाढल्यास किंवा पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास सांडव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहेधरणाची सकाळची पाणी पातळी ४४०६५ मीटर इतकी