गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची आज पाहणी होणार | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची आज पाहणी होणार प्रिंट ई-मेल
नांदेड, दि७ (प्रतिनिधी)ःश्री गणेशोत्सव व रमजान ईद सण उत्साहात,आनंदात आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाय योजना करण्यात येत आहेत या दोन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समस्या लक्षात घेवून महानगर पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उद्या बुधवारी जुन्या नांदेडातील भागासह अन्य भागातील रस्त्यांची पाहणी करणार आहेतया बाबतचा निर्णय आज सायंकाळी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला श्री गणेशोत्सव काळात उकृष्ट काम करणाऱ्या गणेश मंडळांना जिल्हा प्रशासन,महानगर पालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने वेगवेगळी पारितोषिके देण्याचे जाहीर करण्यात आले जिल्हाधिकारी परदेशी यांनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेला सुरूवात करण्यात आल्याचे सांगितले दरम्यान उत्सवाच्या काळात नागरिकांनी स्वाईन फलू बाबत काळजी घ्वावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉश्रीकर परदेशी यांनी केले
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आज झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना खाभास्करराव पाटील खतगावकर यांनी उपस्थित प्रतिष्ठीत नागरिकांनी सुचविलेल्या सुचनांकडे लक्ष वेधत प्रशासनाने या सुचनांच्या बाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले जुना मोंढा भागात अग्नीशमन वाहन ठेवण्याची व गणेश मंडळांना पारितोषिक देण्याची सूचना त्यांनी केली
आडी पीसावंत म्हणाले की, नांदेड जिल्हा हा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो उत्सवाच्या काळात नागरिकांनी शांतता राखावी,रमजान ईद व गणपती उत्सव शांततेत आणि आंनदात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले
महापौर अजयसिंह बिसेन म्हणाले की, श्री गणेशोत्सव काळात पूर्वी पोलीस मित्र संकल्पना यशस्वीरित्या राबवून सक्रीय कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत