|
‘ब्रेन ड्रेन’ ची काळजी नको खाराहुल गांधी |
|
|
औरंगाबाद दि७ ब्रेन ड्रेनची काळजी करण्याचे कारण नाही, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी औरंगाबादेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना व्यक्त केले
पुणे, अकोला व औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांची शिक्षण तंत्रज्ञान, देशाचा विकास आदी बहुविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला देशाच्या प्रगतीसाठी राजकारणात तरूणांचा सहभाग वाढला पाहिजे राजकीय बदलासाठी युवकांच्या सहभागाची गरज आहे राजकारणात रूची असेल, तर रोलमॉडेलची गरज नाही तुम्हीच तुमचे रोलमॉडेल होऊ शकता ग्रामीण व सधन भारत यांना जोडण्याचे काम तरूणांनी केले पाहिजे असे त्यांनी सांगितले सिडको नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध महाविद्यालयांतील अकराशे विद्यार्थी उपस्थित होते परदेशात जाणाऱ्या बुद्धिमान विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्यावर उपाय काय, असे एका विद्यार्थ्याने विचारले त्यावर त्याची काळजी करण्याची गरज नाही ते ही देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत तेथे राहूनही भारतासाठी ते काम करू शकतात आपल्यापेक्षा ब्रेन ड्रेनची काळजी पाश्चात्य देशांना अधिक आहे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत आहे मात्र केंद्र शासनाने पाठविलेल्या एक रूपयांतील सर्व सामान्य जनतेपर्यंत दहा पैसेच पोहचतात या राजीव गांधी यांच्या मताचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या पण खेड्यांची शहरं करण्यासाठी खुप पैसा लागेल आणि तो व्यर्थ खर्च होईल असेही ते म्हणाले पुणे येथे आज दुपारी साडेतीन वाजता विशेष विमानाने राहुल गांधी यांचे आगमन झालेविमानतळावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केलेमहाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे,महाराष्ट्राचेे प्रभारी मोहन प्रकाश,परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,पणनमंत्री हर्षवर्धन पाटील,गृहराज्य मंत्री रमेश बागवे तसेच नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्याम दरक यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत हजर होते |