|
राष्ट्रव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद |
|
|
मुंंबई दि७ कामगारकर्मचाऱ्यांच्या राष्ट्रव्यापी संपाला मुंबई संमिश्र प्रतिसाद मिळाला मंत्रालयात कर्मचाऱ्यांची ५७२१ टक्के उपस्थिती होती
तर मंत्रालयातील लिफ्ट आदि सेवा बंद पडू नयेत यासाठी १०० होमगार्ड तैनात करण्यात आले होते राष्ट्रीयकृत बँका पूर्णपणे बंद होत्या शेअर मार्केट व ट्रेझरीवर देखील संपाचा परिणाम झाला चेक, डिमांडड्राफ्ट आदिंच्या माध्यमातून होणारे १५०० कोटी रूपयांचे व्यवहार आज झाले नाहीत रोख व्यवहार पूर्णपणे ठप्प होते तर एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यात न आल्याने काही ठिकाणी दोन तासात एटीएम मशीन रिकामी होण्याचे प्रकारही घडले चारही प्रमुख इन्शुरन्स कंपन्या पूर्णपणे बंद राहिल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लाईज युनियनचे सरचिटणीस विश्वास यांनी दिली मुंबई उपनगरातील रिक्षा वाहतूक तुरळक होती, मात्र शहरातील टॅक्सी वाहतूक सुरळीत होती संपात माथाडी कामगार सहभागी झाल्याने मुंबई शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यवहार होऊ शकला नाही जीवनावश्यक वस्तुंच्या भावात होणारी वाढ, वाढती बेरोजगारी, पेन्शनचे खाजगीकरण, पेट्रोल, डिझेल, गॅसची भरमसाट भाववाढ, बँकांचे प्रस्तावित खाजगीकरण यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी ८ राष्ट्रव्यापी आणि अन्य स्थानिक कामगार संघटनांनी या संपात सहभाग घेतला होता मंंत्रालयात ५७२१ टक्के इतकी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती लिफ्ट आदि सेवा सुरळीत राहण्यासाठी १०० होमगार्ड तैनात करण्यात आले होते कृषी विद्यापीठे, नगरपालिका, महानगर पालिका व गृहनिर्माण मंडळ, वीज मंडळ, अशी ५२ महामंडळे या सर्वांच्या मिळून सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांनी व शिखकांनी आजच्या संपात भाग घेतल्याची माहिती कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे नियंत्रक रागकर्णिक यांनी दिली |