|
आमदुरा बंधाऱ्यामुळे नांदेड, लोहा, मुदखेड सुजलाम् सुफलाम् होणार |
|
|
|
सिंचनाचे क्षेत्र १००२, स्वयंचलित दरवाजे १६ ; पुष्प संवर्धनासाठी पाणी आरक्षित नांदेड, दि२४ नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड व लोहा तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे
त्यामुळे या भागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होणार असून आमदुरा उच्च पातळी बंधाऱ्याच्या फायदा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे दिसून येत आहे सदरील बंधाऱ्याचे काम येत्या सात ते आठ महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे दरम्यान बंधाऱ्यात दोन महिन्यापूर्वी पाणी साठा करण्यात आला आहे त्यामुळे सदरील भागातील गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा दिसून येत आहे नांदेड जिल्ह्यातील श्री शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामुळे सिंचनासोबतच नांदेडकरांची तहान भागल्या जात आहे विष्णुपूरी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे त्यानंतर आता आमदुरा उच्च पातळी बंधाऱ्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे नांदेडउमरी रस्त्यावरील आमदुरा गावापासून दहा किमीअंतरावर व नांदेड शहरापासून २५ किमीअंतरावर मुदखेड तालुक्यातील देवापूर येथे आमदुरा उच्च पातळी बंधारा गोदावरी नदीवर बांधण्यात येत आहे सदरील बंधाऱ्याचे स्थळ नदीपात्रातून विष्णुपूरी प्रकल्पाच्या निम्नबाजूस ३० किमीअंतरावर आहे प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार आमदुरा उच्च पातळी बंधारा प्रकल्पाची सिंचन क्षमता १००२ हेक्टर असून प्रकल्पाची साठवण क्षमता १२२३ दलघमी आहे या प्रकल्पाचा लाभ नांदेड जिल्ह्यातील १००२ हेक्टर क्षेत्रास होणार आहे तसेच मुदखेड नगर परिषदेकरीता ०९४६ दलघमी आणि मुदखेड पुष्प संवर्धन औद्योगिक वापरासाठी ३२३३ दलघमीअसे एकूण ४१७९ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे या बाबतचा निर्णय ११ ऑगस्ट २०१० रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला दरम्यान बंधाऱ्याच्या दाराची उंची १५० मीटरने वाढविल्याने प्रकल्पाचा पाणी साठा १२२३ दलघमीपासून २३७१ दलघमी झाला आहे त्यामुळे पाणीसाठ्यात ११४८ दलघमीने वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे सदरील सुधारित २३७१ दलघमीच्या जलनियोजनास राज्याच्या जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबर २०१० रोजी मंजूरी दिल्याचे म्हटले आहे बंधाऱ्या संदर्भातील नियंत्रण कक्ष विद्यूत पुरवठा व जोडणीची कामे सप्टेंबर २०११ पर्यंत पूर्ण करून १५ ऑक्टोबर २०११ मध्ये बंधाऱ्यात पाणी साठा करण्यात आला आहे त्यामुळे १००२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून त्यामुळे नांदेड, मुदखेड व लोहा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली येवून या भागातील शेती सुजलाम सुफलाम होणार आहे आमदुरा उच्च पातळी बंधाऱ्याची लांबी २७७५० मीटर असून एकूण पाणी साठा २३७१ दलघमी तर एकूण पाणी वापर २३२० दलघमीराहणार आहे या बंधाऱ्यासाठी १६ स्वयंचलित दरवाजे राहणार आहेत जलाशयाची जोता पातळी ३३८ मीटर पूर्ण जलाशय पातळी |