आता विड्रॉल केवळ एकाच दिवशी | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Wednesday, 22 February 2012
आता विड्रॉल केवळ एकाच दिवशी प्रिंट ई-मेल
० जानेवारी रोजी उमेदवारी माघार

खास प्रतिनिधी
नांदेड, दि२४ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१२ च्या पूर्वघोषीत कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवसाचा अवधी देण्यात आला होता

परंतु आता त्यात सुधारणा करण्यात आली असून ३० जानेवारी या एकाच दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल दि२४ जानेवारी रोजी शेवटची तारीख होती २५ रोजी आज अर्जांची छाननी करण्यात आली २७ ते ३० जानेवारी अशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी होता परंतु त्यात राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा केली असून आता केवळ ३० जानेवारी या एकच दिवशी सकाळी ११ ते ३ या कालावधीत नामांकनपत्र मागे घेता येणार आहेत एखाद्या गटामध्ये किंवा गणामध्ये जर अपील किंवा न्यायालयात प्रकरण प्रविष्ठ झाले तर संबंधीत गट किंवा गणामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ३१ जानेवारी ही ठेवण्यात आली आहे या दिवशी सकाळी ११ ते ३ या कालावधीत नामांकनपत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे असे सांगण्यात आले
राज्य निवडणूक आयोगाकडून विड्रॉल संदर्भात सुधारणा करणारा ईमेल आज दुपारी प्राप्त झाला त्यानंतर या बदलाची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले दरम्यान या बदलामुळे उमेदवारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या असून राजकीय तडजोडी करतांना एकएका उमेदवारांचा एकाच दिवशी निकाल लावण्यासाठी परस्पर विरोधी उमेदवारांना त्रासदायक ठरणार आहे