साने गुरुजींचे विचार ’श्यामची आई’ एकपात्री प्रयोगातून मांडण्याचा चांगला प्रयत्न दामले | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
साने गुरुजींचे विचार ’श्यामची आई’ एकपात्री प्रयोगातून मांडण्याचा चांगला प्रयत्न दामले प्रिंट ई-मेल
परभणी,दि५(प्रतिनिधी) साने गुरुजींचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज असून श्यामची आई या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांपर्यंत पोहचवण्याचा नाट्य बलावंत मधुकर उमरीकर यांचा हा अतिशय चांगला प्रयत्न असून या एकपात्री भावविष्काराचे सादरीकरण जास्तीत जास्त ठिकाणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले
मधुकर उमरीकर यांच्या श्यामची आई या एकपात्री भावनाविष्काराच्या माहिती पत्रकाच्या विमोचन प्रसंगी ते बोलत होते सुरुवातीला प्रशांत दामले यांना उमरीकरांनी प्रयोग सादरीकरणाबाबत आपली भूमिका सांगितली ही संस्कार यात्रा आपल्या सारख्या कलावंतांच्या शुभेच्छा बळावर सुरु असून आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ९७५ प्रयोग महारष्ट्रात करण्यात आले आहेत मिळालेल्या मानधनातून विविध संस्थांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी, कॅन्सरचे रुग्ण यांना मदत करण्यात आली आहे आजपर्यंत लाखो विद्यार्थी व पालकांनी प्रयोग पाहिला असून श्यामची आई या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे कलावंत माधव वझे यांनी हा प्रयोग सगरोळी येथे अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या अधिवेशनात पाहून मला माझे बालपण दाखवले अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली
लातूर जिल्ह्यातील बुधोडा येथे अंध विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रु ओघळले हा सर्वांत महत्वाचा क्षण आपल्या साठी होता असेही सांगितले