वसमत यंत्रमाग सहकारी संस्था भूखंडाचा लिलाव बोलीअभावी रद्द | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
वसमत यंत्रमाग सहकारी संस्था भूखंडाचा लिलाव बोलीअभावी रद्द प्रिंट ई-मेल
वसमत,दि५(प्रतिनिधी) येथील अवसायनातील यंत्रमाग सहसंस्था मवसमत या संस्थेच्या मालकीच्या ७१ भुखंडाचा जाहीर लिलाव बोलीला कोन्हीच नसल्याने रद्द करण्यात आला
सदर संस्थेच्या जागेबाबत मागील काही वर्षांपासून कामगार व प्रशासन यांच्यात वाद असल्याने व यावर काढण्यात आलेला तोडगा शासनाने अमान्य केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने भुखंड विक्रीची प्रक्रिया सुरु केली आहे त्यानुसार वसमत येथील सदर पावरलूम या संस्थेची मालकीची वसमत नगरपरिषद हद्दतील सर्वे नं१७९ मधील चार एकर ३४ गुंठे जमिनीपैकी संस्थेच्या सभासदांनी संस्थेच्या सभासदांना शासनाने दिलेल्या राहत्या घराव्यतिरिक्त चार शेडची मोकळी जागा व शेडचे बांधकाम तसेच संस्थेच्या एकूण ७१ प्लॉटची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला
त्यासाठी येथील तहसील कार्यालयात दि३ फेब्रुवारी २०१० रोजी दुपारी १२ वाजता जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता मात्र ठरवून दिलेल्या वेळेत सदर लिलाव प्रक्रियेत बोली लावण्यासाठी कोणीच आले नसल्याने अखेर सदर लीलाव रद्द करण्यात आला
लिलाव प्रक्रियेसाठी अप्पर जिल्हाधिकारी तुम्मोड, उपविभागीय अधिकारी विजयकुमार फड, तहसीलदार अनिल माचेवाट, साबांविउपअभियंता सूर्यवंशी, सहाय्यक निबंधक एआरगिरी आदींची उपस्थिती होती