|
जायकवाडी धरणात ३४ टक्के पाणीसाठा |
|
|
|
औरंगाबाद,दि१ जायकाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणीपातळी ३४ टक्क्यावर पोहंचली आहे
सध्या धरणात २२ हजार ५० क्युसेस पाण्याचा ओघ सुरु आहे या विषयी कडा कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला मुक्तपाणलोट क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याने धरणात पाण्याचा ओघ मोठया प्रमाणावर सुरु झाला आहे मंगळवारी (३१) दिवसभरात धरणातील पाण्याची पातळी ४ टक्क्यांनी वाढली आहे आज सकाळीही दर तासी २२ हजार ५० क्युसेस पाण्याची आवक होत आहे सध्या धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला असून दारणा,भंडारदरा, ओझर, नांदूर, मधनेश्वर, नागमठाण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे त्यामुळे सायंकाळ पर्यंत धरणात समाधानकारक पाणी साठा होण्याची शक्यता आहे इसापूर धरणाच्या १३ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग नांदेड उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणाची ३१ ऑगस्ट २०१० रोजी १२ वाजता पाणी पातळी ४४०६४ मीटर इतकी होती एकूण पाणीसाठा १२४४७२ दलघमी इतका असून उपयुक्त पाणीसाठा ९२९७६ दलघमी आहे उपयुक्त पाणी साठयाची टक्केवारी ९६४४ टक्के इतकी आहे ३१ ऑगस्टला दुपारी १ वाजेपासून धरणाचे ६ दरवाजे ०५० मी व ७ दरवाजे १०० मी उघडलेले असून ८४०१२ क्यमेक विसर्ग चालू आहे इसापूर धरणाच्या वरच्या बाजूने सरासरी ११०३०८ क्युमेक पाण्याची आवक होत आहे |