परदेशी हातातून साकारली गणेशमूर्ती | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
परदेशी हातातून साकारली गणेशमूर्ती प्रिंट ई-मेल
पुणे, दि७ शाडूच्या गोळे पाहता पाहता आकार घेत होते आधी बैठक, त्यानंतर तुंदील तन्‌ आणि मग वक्रतूंड मूर्ती आकार घेत असतांनाच त्या चेहऱ्यांवरही हसू उमटत होते अवघ्या दोन तासांत छान, सुबकशी बैठी गणेशमूर्ती साकारली गेली आणि एकेक ग्रुप आनंदाने खिदळायला लागला हा सारा माहौल होता गोखले नगरातील एका लहानशा सभागृहात आणि मूर्तीकार होते सॅममेगनमॅथीजस्टीन आणि असे एकूण २६ अमेरिकन विद्यार्थीविद्याथर्नीीं
वैज्ञानिक विचारसणी व कौशल्यवृध्दीसाठी स्थापन झालेल्या शास्त्रवाहिनी संस्थेतर्फे हा उपक्रम घेण्यात आला असोसिएटेड कॉलेजस ऑफ मीडवेस्टच्या कल्चर, ट्रॅडिशन्स अँड ग्लोबलायजेशनच्या उपक्रमांतून पुण्यात सहा महिन्यांसाठी आलेल्या विद्यार्थीविद्याथर्नीींनी हौसेने यामध्ये भाग घेतला इंडॉलॉजीचा अभ्यास आणि यूथ एक्स्चेंजच्या मार्फत हे विद्यार्थी विद्याथर्नीीं पुण्यात शिकत आहेत
मूर्ती बनविण्यासाठी या विद्यार्थी गटाला श्री गणेशाचे महत्व आणि त्याचे भारतीय संस्कृतीतील स्थान समाजवून सांगण्यात आले त्यानंतर मूर्ती बनवून दाखविण्यात आली या प्रात्यक्षिकानंतर विद्यार्थ्यांनी कामाला सुरुवात केली दोन तासांच्या कारागिरीतून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातून सुबकशी गणेशमूर्ती साकारली गेली
विशेष म्हणजे या गटाने आज निर्मिती केलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत शास्त्रवाहिनीच्या विश्वस्त सौसुनीता खरे यांनी विविध प्रयोगांद्वारे या मूर्तीची प्रमाणे ठरविली आहेत ज्यामुळे १० वर्षापासून पुढील वयाच्या कोणत्याही व्यक्तीस अतिशय प्रमाणबध्द मूर्ती तयार करता येते शास्त्रवाहिनीचे प्रमुख माधव खरे, सौअंजू भागवत यांनी या उपक्रमाचे संचलन केले सिंबायोसिस, न्यू इंडिया, सिटी प्राइड, जयहिंद स्कूल पिंपरी व शास्त्रवाहिनीच्या चार केंद्रांवर मिळून यंदा सहाशे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत