टपाल खात्याची एकाच ठिकाणी दोन कार्यालये! | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
टपाल खात्याची एकाच ठिकाणी दोन कार्यालये! प्रिंट ई-मेल
परभणी, दि७ मध्यवस्ती व चोहोबाजूंच्या वसाहतीच्या कानाकोपऱ्यातील टपाल कार्यालये ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने निरुपयोगी ठरली आहेत सोयीच्या ठिकाणी टपाल कार्यालये स्थलांतरित करण्यात टपाल कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आडमुठी भूमिका नडत आहे
गेल्या आठदहा वर्षांपासून संपूर्ण शहराचा चोहोबाजूंनी मोठा विस्तार होतो आहे विशेषतः वसमत रस्त्यावरील वसाहती कारेगाव जलशुध्दकरण केंद्रापर्यंत पोचल्या आहेत गंगाखेड रस्त्यावरील टोल नाक्यापर्यंत, दर्गा रस्त्यावरील जांब शिवारापर्यंत, मानवत रस्त्यावरील मदरशापर्यंत, जिंतूर रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्रापर्यंत, धार रस्त्यावरील धार शिवारपर्यंत, वांगी शिवारासह कारेगावपर्यंत वसाहती पोचल्या आहेत परंतु या नवनवीन वसाहतींना नाल्या, रस्ते, पाणी, पथदिव्यांसह अन्य मूलभूत सोयी सुविधा आजपर्यत मिळू शकल्या नाहीत नगरपालिका प्रशासन व संबंधित ग्रामपंचातीच्या हद्दीच्या वादासह समन्वय नसल्यामुळे या सोयी दुर्लक्षित आहेत त्यामुळेच या भागातील लाखो नागरिक मूलभूत सोयीसुविधांपासून पूर्णतः वंचित आहेत या सुविधा कधी मिळणार हे स्पष्ट नाही विशेषतः टपाल खात्याच्या आडवळणावरील कार्यालयामुळे या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे
शनिवार बाजारात टपाल खात्याचे मुख्य कार्यालय आहे टपाल खात्याने अन्य नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून मोठी ओरड झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर जिल्हा व सत्र न्यायालय, क्रांती चौक, दादाराव प्लॉट व पेडगाव रस्त्यावर व कृषी विद्यापीठात टपाल कार्यालय कार्यान्वित केले परंतु त्या भागातील हे टपाल कार्यालय आडवळणावरील वस्त्यांमधून थाटले आहेत त्यामुळे या कार्यालयांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे कारण त्या त्या भागातील हजारो नागरिकांना ही कार्यालये गैरसोयीची व अडचणीची ठरली आहेत सोयीच्या ठिकाणी कार्यालये स्थलांतरीत करावीत, या संदर्भात नागरिकांनी सातत्याने ओरड केली परंतु टपाल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे व सरकारी लालफितीमुळे मोक्याचया ठिकाणी टपाल खात्याची कार्यालये आजपर्यंत स्थलांतरित झाली नाहीत जिल्हा व सत्र न्यायालयाजवळ निजामकालीन इमारतीत टपाल कार्यालय कार्यरत होते
न्यायालयासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, विक्रीकर कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका, कोषागार, उपविभागीय कार्याल, तसेच अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयांसाठी अत्यंत सोयीचे ठरले होते