|
प्रताप पाटील जिगळेकर गटाचे ७ पैकी ५ उमेदवार विजयी |
|
|
नरसीफाटा, दि८ (वार्ताहर) येथून तीन किमी अंतरावर असलेल्या जिगळा ताबिलोली येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या झालेलया निवडणुकीत खा भास्करराव पाटील खतगावकर यांचे खंदे समर्थक प्रताप पाटील जिगळेकर यांच्या ग्राम विकास पॅनलने ७ पैकी ५ जागेवर दणदणीत विजय मिळवून तिसऱ्या आघाडीला धुळ चारली बिलोली तालुक्यातील जिगळा हे गाव राजकारणात अग्रेसर म्हणून ओळखल्या जाणारे गाव होय येथील ग्रामपंचायतींवर सरपंचपद अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाले आणि तेव्हापासून गावातील प्रतिष्ठितांनी निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला प्रारंभ केला येथील विद्यमान सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप पाटील जिगळेकर यांचे ग्रामविकास पॅनल आणि प्रतिस्पर्धी डीआर कांबळे यांचे पॅनल तर तिसऱ्या आघाडीचे जिप सदस्य लक्ष्मण ठक्करवाड समर्थक असलेले व्यंकटराव पाटील जिगळेकर, समृत कानोले, शिवाजी पा जिगळेकर यांचे पॅनल अशी तिरंगी लढत झाली विकासच्या मुद्यावर ग्रामविकास पॅनलने स्पष्ट बहुमत प्रस्थापित केले विजयी उमेदवार असे प्रतािप गोविंदराव जिगळेकर, भगवान चांदु जिगळेकर, शांताबाई गणपत बनसोडे, बिनविरोध पुंडलीक गणपती शिरोळे, महादाबाई पुंडलिक शिरोळे हे पतीपत्नी बहुमताने विजयी झाले तर प्रतिस्पर्धी गट डीआर कांबळे यांच्या गटाला केवळ दोन जागेवरच समाधान मानावे लागले तर तिसऱ्या आघाडीचे पाणीपत झाले
|