संतप्त प्रवाशांनी दौंड स्थानकात रेल्वे रोखली | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
संतप्त प्रवाशांनी दौंड स्थानकात रेल्वे रोखली प्रिंट ई-मेल
पुणे, दि८ दौंड पुणे शटल रेल्वेला सातत्याने उशीर होत असल्याने प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत आज सकाळी या मार्गावरील रेल्वे सेवा बंद पाडली
सकाळी पावणेसहा वाजता आलेली दौंड पुणे ही शटल रेल्वे संतप्त प्रवाशांनी दौंड रेल्वे स्थानकामध्ये रोखून धरली परिणामी दौंड मुंबई आणि पुणे दौंड रेल्वे सेवा ठप्प झाली आतापर्यंत दौंड रेल्वे स्थानकाजवळ सहा रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत त्याचा फटका रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या उरुळी, हडपसर, लोणी, यवत, केडगाव येथील प्रवाशांना बसला आहे सरकारी कर्मचारी, दूधवाले, भाजीवाले आणि विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे
प्रवासी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून शटलच्या काचा देखील फोडल्या आहेत ही रेल्वे आज सलग दुसऱ्या दिवशी उशिरा आली आहे अशी त्यांची तक्रार आहे रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी सध्या रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही