गोपाळचावडी येथे ७ फेब्रुवारी पासून मातंग समाजाची महायात्रा | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
गोपाळचावडी येथे ७ फेब्रुवारी पासून मातंग समाजाची महायात्रा प्रिंट ई-मेल
नवीन नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) मातंग समाजातील महान तपस्वी आनंदरत्न शिरोमणी योगी विठ्ठल गुरू महाराज यांची मातंग समाजातील महायात्रा श्री क्षेत्र गोपाळचावडी येथे दि ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली
महायात्रेची सुरूवात दि ७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजल्यापासून सुरू होणार आहे धनेगावचे बाळगीर पंचमगीर महाराज व कोलंबीचे गंभीरबन महाराज यांच्या हस्ते महापूजेचे आयोजन केले आहे यावेळी मधुसूदन महाराज, रावसाहेब महाराज व केदार जगद्‌गुरू हे प्रमुख महंत उपस्थित राहणार आहेत दि १३ फेब्रुवारी रोजी जाहिर प्रबोधन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाभास्करराव पाटील खतगांवकर, बाबाराव भारस्कर, स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे, गृहराज्यमंत्री रमेश बागवे, बाबासाहेब गोपले, आओमप्रकाश पोकर्णा, आडीपीसावंत, आशंकरअण्णा धोंडगे, आरावसाहेब अंतापूरकर, आवसंत चव्हाण, माजी आकमलकिशोर कदम, बीआरकदम, माणिकराव इंगोले, उपाध्यक्ष गंगाधर चाभरेकर, उपमहापौर महेश पवळे, आदिंची प्रमुख उपसिथती राहणार आहे दि १४ फेब्रुवारी रोजी पालखीची भव्य मिरवणूक काकडा आरती होणार आहे त्याच दिवशी दुपारी १ वा गोविंद दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीचा जंगी फड रंगणार आहे या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन तुकाराम महाराज मंगल सांगवीकर, नारायण कोलंबीकर, दिगंबर घंटेवाड, विठ्ठल सूर्यवंशी आदिंनी केले आहे