निधी तात्काळ खर्च करण्याची मागणी | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
निधी तात्काळ खर्च करण्याची मागणी प्रिंट ई-मेल

नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयास चालु वर्षासाठी विविध उपक्रमासाठी शासनाच्या वतीने निधी पाठविण्यात आला आहे वर्ष संपत आले तरीही निधी चा विनियोग झाला नाही संबंधितांच्या उदासिनतेमुळे निधी परत जाण्याची शक्यता आहे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ खर्च करण्याबाबत आदेश द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी सेवादलाचे बालाजी गऊळकर, संतोष बरूडे, जयराज चव्हाण, कामाजी सरोदे, बाबुराव वाघमारे, माधव पुयड पाटील, शिवराम पांचाळ, संजय धुमाळ, विठ्ठल वाळले आदिंनी केले