दलित वस्तीच्या विकास कामाचे आराखडे अचूक दाखल करासमाजकल्याण सभापती | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
दलित वस्तीच्या विकास कामाचे आराखडे अचूक दाखल करासमाजकल्याण सभापती प्रिंट ई-मेल
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सुचनेनुसार दलित वसतीत विकासकामे करण्याकरिता गट विकास अधिकाऱ्यामार्फत आराखडेचुकीचे आलेले आहेत ते आराखउे प्रत्येक गावाच्या सरपंचांना व ग्रामसेवकांनी चर्चा करून व पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्या निदर्शनास आनुनच दुरूस्ती आराखडे समाज कल्याण विभाग जिपनांदेडकडे दि १५ फेब्रुवारी १० पर्यंत पाठवून देणे आवश्यक आहे याचे कारण लवकरात लवकर आराखउे समाज कल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देवून शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे
तसेच चालू वर्षाच्या निधीचे वाटप आराखड्यानुसारच आवशख्यक आहे सदर आराखड्यानुसारच येत्या पाच वर्षात दलित वसतीचा निधी देणे बंधनकारक राहणार आहे आराखडे योग्य व अचूक पाठविण्याचे संपूर्ण जबाबदारी गटविकास अधिकारी यांची राहील याची नोंद घेण्याबाबत जिपसमाजकल्याण सभापती सौकमलबाई गायकवाड यांनी कळवले आहे