सुशिलकुमार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
सुशिलकुमार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप प्रिंट ई-मेल
नांदेड, दि १ (प्रतिनिधी) ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मा सुशिलकुमार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यादान कोचिंग क्लासेस सिडको येथे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू पंडीत यांच्याकडून सुशिलकुमार जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक गायकवाड सर यांनी केली सुशिलकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हे काळाची गरज आहे, त्याचे महत्व पटवून दिले तसेच आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाइी शिक्षण हे प्रामाणिकपणे शिकून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेच पाहिजे, असे उद्‌गार काढले जिल्ह्याध्यक्ष बाळू पंडित यांच्या तर्फे व प्रा गायकवाड यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन क्रांतीदीप थोरमोठे, यांनी केले आभार प्रदर्शन राहूल पळवे यांनी मानले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सचिन कंधारकर, प्रशांत सोनकांबळे, प्रकाश भंडारी, संतोष तोबरे, मिर्झा अहेमद बेग, श्याम सोनकांबळे, धनराज गव्हाने, प्रमोद पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकोषाध्यक्ष राहुल कांबळे यांनी परिश्रम घेतले