|
भीम क्रांती नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने जेतवन बुद्धविहारात बुद्ध मुर्तीची स्थापना |
|
|
नांदेड,दि१ (प्रतिनिधी)ः जेतवन बुद्धविहार, भीमटेकडी, गोवर्धनघाट, नांदेड येथे मदत उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते बुद्ध मुर्तीची स्थापना करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ एसपी गायकवाड हे होते ही बुद्ध मुर्ती पीके कदम यांच्या दानातून प्राप्त झालेली आहे प्रारंभी भदंत जीवनरत्न थेरो यांनी आपल्या मनोगतात जेतवन बुद्ध विहाराच्या प्रांगणात भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाई यांचे भव्य पुतळे उभारणे व दोन मजली बुद्ध विहाराचे बांधकाम इथे केले जाईल, असा संकल्प व्यक्त करुन या विहारात भन्ते शीलरत्न यांचे वास्तव्य राहिले असे सांगितले डॉ संग्राम जोंधळे व डॉ वंदना जोंधळे यांनी भिक्खू संघास चिवरदान करुन भिक्खू संघाचे स्वागत केले भन्ते नंद, भदंत ज्ञानरक्षित आर्या धम्मदिपा, भदंत उपगुप्त महाथेरो यांची या प्रसंगी धम्मदेसना झाली नगरसेवक तुलजारसिंह यादव यांनी जेतवन बुद्ध विहाराच्या विकास कामासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमास व्हीके भालेराव, प्रफुल्ल सावंत, डीपी गायकवाड, प्रभाकर नांदेडकर, डीबी कांबळे, डीडी भालेराव भगवान गायकवाड यांच्यासह मोठा भिक्खू संघ, भिक्खूनी संघ व नांदेड शहरातील अनेक वार्डातील महिला मंडळे, उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भीम क्रांती नवयुवक महामंडळाचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले
|