रसायन मिश्रीत ताडी विक्री बंद करण्याची मनसेची मागणी | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
रसायन मिश्रीत ताडी विक्री बंद करण्याची मनसेची मागणी प्रिंट ई-मेल
बिलोली दि १ (ता प्र) बिलोली तालुक्यातील अनेक दुकानातून रसायन मिश्रीत ताडी विक्री केल्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने ताडी विक्रीचा परवाना रद्द करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष विपुल पटणे यांनी तहसिलदार यांना निवेदन देवून केली आहे
येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडापूर येथील शिंदी डेपोतील भेसळीचे पदार्थ व रसायनमिश्रीत ताडी हस्तगत करुन तालुका उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणली बिलोली तालुक्यात काही महिन्यांपासून अनेक गावातून रसायनमिश्रीत ताडीची सर्रासपणे विक्री होत आहे क्षेत्रिक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी ताडी विक्रेत्याशी चिरीमिरी व्यवहार करीत याकडे जाणीणपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असे निवेदनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
तालुक्यातील रसायनमिश्रीत ताडी विक्री बंद करण्याबाबत मनसे नी यापूर्वी ही लेखी व तोंडी सूचना दिलेली होती एकवेळ मोर्चाही काढला होता दरम्यानच्या काळात काही प्रमाणात भेसळ ताडी विक्रीवर आळा बसला होता गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात सर्रासपणे भेसळ ताडी विक्री होत आहे लोकांना निरनिराळ्या आजारास सामोरे जावे लागत आहे उत्पादन शुल्क विभागचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत, अशी तक्रार होत आहेमनसेचे तालुकाध्यक्ष विपुल पटने, संतोष उत्तरवार, नरेश मोटे, रमेश जाधव, श्रीनिवास शिंदे, शंकर महाजन यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांनी दगडापूर येथील शिंदी डेपोत जावून बनावट शिंदीचे विविध पदार्थ पेट्या उत्पादन शुल्क कार्यालयात आणले तालुक्यातील भेसळयुक्त ताडी विक्री बंद करावी, परवाना रद्द करावा, दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केले आहे अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशरा देण्यात आला आहेे