कंधार येथे विहींपच्या वर्धापण दिनी दहीहंडीचे आयोजन | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
कंधार येथे विहींपच्या वर्धापण दिनी दहीहंडीचे आयोजन प्रिंट ई-मेल
कंधार दि १ (ताप्र) विश्व हिंदू परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त कंधार येथे दि ५ सप्टेंबर रोजी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विहींप जिल्हासहमंत्री गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिली
प्रतिवर्षाप्रमाणे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात येते दि ५ सप्टेंबर रोजी शिवाजी चौक येथे सायं ६ वाजता होणाऱ्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये असून कृष्णा मामडे यांच्या वतीने हे बक्षीस ठेवण्यात आले आहे सुमारे २५ फुट उंचीच्या दहीहंडी कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकाश नळगे, कृष्णा मामडे हे असून कार्यक्रमाचे संयोजक विहींप व बजरंग दल करणार आहेत
दहीहंडी या होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गोविंदा मंडळांनी दि ३ सप्टेंबर रोजी पर्यंत नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान गोकुळाष्टमी निमित्त शहरातील तरुणांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुकतेचे वातावरण पसरले असून अनेक तरुणांची दहीहंडी मंडळे दहीहंडी फोडण्यासाठी प्रात्यक्षिके व सराव करताना दिसत आहेत त्यामुळे या वर्षीचा दहीहंडीचा उत्साह चांगलाच रंगणार असल्याचे दिसत आहे