‘तंटामुक्ती आपल्या दारी’ चे मालेगाव येथे उद्‌घाटन | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
‘तंटामुक्ती आपल्या दारी’ चे मालेगाव येथे उद्‌घाटन प्रिंट ई-मेल
नांदेड दि१ (प्रतिनिधी) मालेगाव येथील तंटामुक्ती समितीने हाती घेतलेल्या ‘तंटामुक्त आपल्या दारी’ हा उपक्रम राज्यातील तंटामुक्ती चळवळीला नवी दिशा दाखविणारा असून या उपक्रमाने राज्यभर निश्चितच स्वागत होईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांनी व्यक्त केले
मालेगाव ता अर्धापूर येथील म गांधी तंटामुक्ती समितीच्या वतीने आयोजित ‘तंटामुक्ती आपल्या दारी’ या मोहिमेचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिप चे अध्यक्ष माणिराव इंगोले होते कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून विभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक परांडे, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे संचालक रंगरावजी पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव पाटील, सरपंच सुदर्शन वाघमारे, ज्येष्ठ नागरिक गोविंदराव इंगोले, पत्रकार संघाचे निळकंठ मदने यांची उपस्थिती होती
अर्धापूर पोलिस ठाणे व तंटामुक्ती समिती मालेगावच्या वतीने ‘तंटामुक्ती आपल्या दारी’ नामफलकाचे अनावरण आणि गणेश उत्सवाच्या निमित्त शांतता कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
सुधाकरराव डोईफोडे यांनी तंटे मिटवितांना निःपक्षपातीपणाची भूमिका समितीने घेऊन सर्वांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्नांनी पराकाष्ठा करावी, असे आवाहन केले
मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शोभेल अशी कामगिरी मालेगाव येथील तंटामुक्ती समितीने केल्याबद्दल नागोराव इंगोले व त्यांच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले मालेगाव हे गाव तंटामुक्त होत असताना ते हागणदारीमुक्त झाले नाही याबद्दल खंत व्यक्त करुन ही उणीव सर्वांच्या सहकार्याने दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली
यावेळी प्रास्ताविकात पोलिस निरीक्षक परंडे यांनी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून एक गाव एक गणपती हा संकल्प राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिकराव इंगोले यांनी गाव हाणगदारीमुक्त करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मात्र स्वच्छ ठेवण्याबरोबरच स्वच्छ पर्यावरणासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतल्यास शासनाच्या माध्यमातून भरीव सहकार्याने आश्वासन दिले कार्यक्रमास उपसरपंच बालाजी मुरकुंदे, दुर्गाप्रसाद सारडा, सतीश कुलकर्णी, शेषराव इंगोले, डॉ लक्ष्मणराव इंगोले, टोपाजी पाटील, नारायण पाटील, संतोष दंडे, डॉ रावसाहेब देवमडे, मारोती निमेवार यांच्यासह तंटामुक्ती सदस्यांनी परिश्रम घेतले