गोरगरिब व सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार अॅड धोंडगे | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
गोरगरिब व सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार अॅड धोंडगे प्रिंट ई-मेल
लोहा दि१ (ताप्र) राज्यात शेतकरी कामगार पक्ष वाढीसाठी रायगड पॅटर्न राबवणार असून संपूर्ण राज्यात शेकाप बांधणी करुन गोरगरिब जनतेचे प्रश्न व सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नवीन औद्यागिक धोरण तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पुरोगामी युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुरुषोत्तम धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली
परभणी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली २८ व २९ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत आ जयंत पाटील, अॅड केशवराव धोंडगेसह राज्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते या बैठीकमध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रणित पुरोगामी युवक आघाडीच्या राज्च चिटणीसपदी अध्यक्ष अॅड पुरुषोत्तम धोंडगे यांची निवड झाल्याची घोषणा आ जयंत पाटील यांनी केली असल्याची माहिती दिली ते पुढे बोलतांना म्हणाले की, संपूर्ण राज्यात नव्या उभारीने पक्षाची बांधणी करण्यात येणार असून पक्ष ज्या ठिकाणी चांगली कामगिरी करेल त्या ठिकाणी आगामी सर्व निवडणुका येथील लढवण्यात येतील असे धोंडगे म्हणाले यावेळी शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने बांधणी झालेली आहे येथे सर्व संस्थापक, शेतकरी सत्ता आहे त्याच प्रमाणे राज्यात पक्ष बांधणीसाठी रायगड पॅटर्न राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले
या पत्रकार परिषदेला मधुकर वानखेडे, सुधाकर पवार, हरिभाऊ शिंदे, लुंगारे, प्रा राजेश गोरेसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते