धर्माबाद शहरात मोकाट जनावरांच्या सुळसुळाटामुळे नागरिक त्रस्त | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
धर्माबाद शहरात मोकाट जनावरांच्या सुळसुळाटामुळे नागरिक त्रस्त प्रिंट ई-मेल
धर्माबाद दि १ (ताप्र) गेल्या अनेक महिन्यापासून शहरात मोकाट जनावरांचा अतिशय सुळसुळाट झाला असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासन निष्क्रिय ठरत असल्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास दिडशे ते दोनशे जनावरे ज्यात गाई, वासरे व गोऱ्यांचा समावेश आहे ते चोविस तास प्रमुख रस्त्यावर वावरत आहेत एवढेच नव्हे तर शहरातील प्रमुख चौकावर ज्यामध्ये पानसरे चौक, नरेंद्र चौक, नेहरु चौक, नपा चौक अशा वर्दळीच्या ठिकाणी २० ते २५ जनांवरांचा घोळका विश्रांती घेत असतो त्यामुळे रहदारीस अतोनात त्रास सहन करावा लागत असून वाहन धारकांना आपले वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे अपघाताची शक्यता कमालीची वाढली आहे
धर्माबाद शहरातील रस्त्यांवर आठवडीबाजार भरतो त्यामुळे या ठिकाणी महिला वर्गाची व नागरिकांची मोठी गर्दी होत असते शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा मुख्य मार्ग असून यामुळे विद्यार्थ्यांसाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे
या रस्त्यावरुन अनेक खाजगी व इतर वाहने धावत असतात त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे रस्त्यावरून चालतांना सामान्य पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकाचौकात अशी मोकाट जनावरे फिरत आहेत तर काही ठिकाणी घोळका करुन ही जनावरे वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे