|
भोकर ग्रामपंचायतीच्या ६९ कर्मचाऱ्यांचे नगर परिषदसेवेत समावेशन |
|
|
नांदेड,दि१ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे भोकर ग्रामपंचायतीच्या ६९ कर्मचाऱ्यांचे नगर परिषद सेवेत समावेशन करण्यात आले असून या कर्मचाऱ्यांना आता सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे भोकर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत १३ नोव्हेंबर, २०१० रोजी रुपांतर झाले, तेव्हापासून जुन्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगर परिषद आस्थापनेवर सामावून घेण्याचा प्रश्न निर्माण झाला होता ग्रामपंचायतीच्या सेवेत असताना त्यांना सरासरी ३००० ते ५००० एवढेच वेतन प्रतिमाह मिळत असे, ग्रामपंचायतीचे नगर परिषरदेत रुपांतर झाल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या भविष्यातील सेवेबाबत संभ्रम होता कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले चव्हाण यांनी निकषात बसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नगर परिषद आस्थापनेवर सामावून घेतले जाईल आणि राज्यातील अन्य नगर परिषद कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या वेतनश्रेणीनुसार कायम केले जाईल असे आश्वासीत केले होते कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ श्रीकर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला प्रस्ताव आयुक्त तथा संचालक, नगर परिषदप्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई यांनी सचिव नगर विकास तथा पालक सचिव, नांदेड मनुकुमार श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनानुसार नुकताच मंजूर केला आहे२७ ऑगस्ट २०१० रोजीच्या संचालकांच्या आदेशानुसार एकूण ६९ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद सेवेत सामावून घेण्यात आले आहे तसेच त्यांना अन्य प्रचलित लाभ लागू करण्यात आले आहेतसदर कर्मचाऱ्यांना एप्रिल ते सप्टेंबर २०१० या कालावधीत एकूण ७८६६ लक्ष रुपये एवढे तदर्थ वेतन अनुदानही दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना आता सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळेल, त्यासाठी ७८६६ लक्ष रुपये तदर्थ वेतन अनुदानही दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना येत्या गणपती उत्सव व रमजान ईदची विशेष भेट मिळाली आहेभोकर प्रमाणेच नेर नवाबपूर, मलकापूर, भडगाव, केज इ नगर परिषदांना वेतन अनुदान मंजूर करण्यात आले आहे या बरोबरच राज्यातील नगर परिषदांमधील नगर भूमापनाचे काम हाती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यासाठी जमावबंदी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, ज्या नगर परिषद क्षेत्रात नगर भूमापनाचे काम केले जाणार आहे, अशा नगर परिषदांत भोकर नगर परिषदेचा देखील समावेश शासनाने केला आहे
|