|
धान्य पुरवठा एसएमएस सेवेचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ |
|
|
नांदेड,दि१ (प्रतिनिधी)सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (पीडीएस) वाटप होणाऱ्या योजना निहाय धान्याची माहिती एसएमएसद्वारे गावपातळीवरील प्रमुख मंडळींना देण्याच्या योजनेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ श्रीकर परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला डॉ परदेशी यांनी संगणकावरील कळ दाबून मुदखेड तालुक्यातील गावकऱ्यांना एसएमएस पाठवून विविध योजनेअंतर्गत त्यांच्या गावाच्या रास्तभाव दुकानदाराला कोणते व किती धान्य पाठविले याची माहिती दिली यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी हनुमंतराव अरगुंडे, रोहयो उपजिल्हाधिकारी जगदीश मणीयार, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ निशिकांत देशपांडे, तहसीलदार मुदखेड विजय राऊत व कोहर्टचे संचालक अजय खंदारे उपस्थित होते नांदेड जिल्हयातील सर्व गोदामातून योजनानिहाय रास्तभाव दुकानदारांना वितरित होणारे धान्य इत्यादी बाबतची माहिती संबंधित गावातील दक्षता समितीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष यांना एसएमएसद्वारे माहिती देण्याची सुविधा पुरवठा विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे यासाठी सॉप्टवेअर तयार करण्यात आले आहे गावातील रास्तभाव दुकानदाराकडे कोणत्या योजनेचे किती धानय पाठविले याचा तपशील या अंतर्गत पाठविण्यात येणाऱ्या एसएमएसमध्ये असणार आहे सदरील मोहीम टप्प्याटप्याने महिनाभरात पूर्ण जिल्हयात राबविण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यातील बीपीएल, एपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्याचे संगणकीकरण करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले बाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्हा दक्षता समितीस दिली धान्य पुरवठयाबाबत एसएमएस प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित होणाऱ्या अन्नधान्याची माहिती संबंधित गावातील प्रमुख व्यक्तींना मिळाल्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता येणार आहे
|