|
आईवडिलांच्या काबाडकष्टाचे ज्ञानेश्वरकडून चीज झाले |
|
|
नांदेड दि७ (प्रतिनिधी) आईवडील मोलमजुरीचे काम करतात घरची परिस्थिती अतिशय हलाखीची काबाडकष्ट करून थोरल्या मुलाला एमबीबीएसचे शिक्षण देत असतानाच धाकट्या ज्ञानेश्वरलाही शिकविण्याचे ठरविले या कष्टाचं चिज करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ज्ञानेश्वरने यावर्षी झालेल्या सीईटी परीक्षेत २०० पैकी १७० गुण मिळवून राज्यात १०५३ वा तर ’व्हीजेएनटी’ या प्रवर्गात अकरावा क्रमांक पटकाविला व एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरला ज्ञानेश्वर रुस्तुम चव्हाण हा लोहा तालुक्यातील हिराबोरी तांडा गावचा रहिवासी घरी कोणतीही स्थावर मालमत्ता किंवा शेती नसल्याने आईवडिलांनी अतिशय काबाडकष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना शिकविण्यासाठी जिवाचे रान केले रोज मजुरी करून आपल्या मुलांना शिकवायचे, असा ध्यास त्यांनी घेतला होता घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना यावर मात करून त्यांचा मोठा मुलगा गणेश याने एमबीबीएसला प्रवेश मिळविला तो सध्या मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे ज्ञानेश्वर हा लहानपणापासून हुशार असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री दत्तात्रय विद्यालय, डोंगरगाव येथे झाले दहावीच्या परीक्षेत ७८६० टक्के तर बारावीच्या परीक्षेत त्याने ८२ टक्के गुण मिळविले ज्ञानेश्वरलाही आपल्या भावासारखे एमबीबीएस’चे शिक्षण घ्यावयाचे असल्याने तो नांदेड येथे स्थायिक झाला रुमचे भाडे व जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आई, वडिलांनी मजुरी करून तर कधी उसने पैसे घेऊन आपल्या मुलाची सोय केली शिकवणीसाठी पैसे नसल्यामुळे अडचण निर्माण झाली ज्ञानेश्वरच्या आर्थिक परिस्थितीची माहिती कोनाळे माकणे मुंडे व चौगुले कोचिंग क्लासेसला मिळाली त्यांनी ज्ञानेश्वरला आर्थिक मदत केली; तसेच त्यांच्या मदतीने कोनाळे, माकणे, चौगुले क्लासेसने ज्ञानेश्वरला मोफत प्रवेश देऊन त्याला मार्गदर्शन केले या सर्वांच्या मदतीने ज्ञानेश्वरने कठीण परिश्रम घेऊन वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत राज्यात जनरल यादीत १०६५३ वा तर मराठवाडा विभागात २९८ वा राज्यात व्हीजेएनटी प्रवर्गात ११ वा, तर मराठवाड्यात सातवा क्रमांक मिळवला सीईटीच्या वैद्यकीय पूर्वपरीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी या विषयात २०० पैकी १७० गुण घेऊन त्याने अखेर एमबीबीएसला प्रवेश मिळविण्याचे स्वप्न साकार केले आर्थिक मदतीचे आवाहन ज्ञानेश्वरचे आई, वडील मजुरी करतात काबाडकष्ट करून ते आपल्या थोरल्या गणेश या मुलाला वैद्यकीय शिक्षण देत असतानाच ज्ञानेश्वरलाही संधी मिळाली मात्र, दोन्ही मुलांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी एवढा मोठा पैसा आणायचा कुठून? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे याआधी बारावीच्या शिक्षणासाठी नामदेव केंदे यांनी मदत केली, पण या पुढील खर्च झेपत नसल्याने समाजातील स्वयंसेवी संस्था, संघटना; तसेच दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन ज्ञानेश्वरने सकाळ’च्या माध्यमातून केले आहे
|