|
नरसी ग्रामपंचायतीवर आपलं पॅनलचं निर्विवाद वर्चस्व |
|
|
नरसी दि७ (वार्ताहर) जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील ग्रामपंचायतीवर भाजपासेनाराष्ट्रवादी युतीचे पुरस्कृत १७ पैकी १६ उमेवार दणदणीत विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे येथील निवडणुकीसाठी दोन गट आमनेसामने झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे, राष्ट्रवादीचे भास्कर पाटील भिलवंडे, सेनेचे रविंद्र पाटील भिलवंडे यांच्या नेतृत्वाचे ‘आपलं पॅनल’ ला येथील मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला मात्र विरोधी ग्रामविकास पॅनलला मतदारांनी जबर धक्काच दिला आहे आपलं पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे श्रीरामे खनपटे, पत्रकार भुषण पारळकर, सुधारक भिलवंडे, वसंत कस्तुरे, प्रभाकर गायकवाड, नुरजहॉबी मोहम्मद गौस, मोहन भिलवंडे, व्यंकट कोकणे, मिराताई भेदे, सुमनबाई बट्टेवाड, खाळीबा सुर्यवंशी, शे जहीराबी शे बाबू, कुरेशी रजीयाबी हबीबसाब, सय्यद पिरसाब, सौ मथुराबाई धोंडीबा सूर्यवंशी यांचा समोवश आहे तर प्रतिस्पर्धी ग्रामविकास पॅनलची सौ लक्ष्मीबाई नंदकिशोर टोकलवाड ह्या विजयी झाल्या आहेत आपलं पॅनलच्या समर्थकांनी निकाल ऐकताच नरसीच्या मुख्य चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करुन ढोल ताशांच्या गजराज विजयी मिरवणूक काढून जल्लोषात साजरा केला
|