ज्ञानाबरोबर नीती,सदगुण यांचे संवर्धन आणि जोपासना करावी कुपटीकर | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
ज्ञानाबरोबर नीती,सदगुण यांचे संवर्धन आणि जोपासना करावी कुपटीकर प्रिंट ई-मेल
नांदेड दि७ (प्रतिनिधी) जीवनात काही साध्य करावयाचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक ध्यास व दुसरी अभ्यास अध्यापन ही एक सर्वश्रेष्ठ कला आहे हे आपण जाणताच कोणतीही कला यशस्वी व्हायची असेल तर तिला आत्मविश्वासाची बैठक पाहिजे आजकाल आपणांस शिक्षणच द्यावे नसून ज्ञानाबरोबर नीती व सद्‌गुण यांचे संवर्धन व जोपासना करायची आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक अनिल कुपटीकर यांनी सर्वपल्ली डॉ राध्याकृष्णन यांची ११२ वी जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करतांना प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले
सहयोगनगर येथील महात्मा कबीर विद्यालयात नवनिर्वाचित विद्यार्थी संसदच्या वतीने डॉ राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षा विद्यार्थी संसद अध्यक्ष कु दिपाली पाचपुते ही होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अनिल कुपटीकर यांची उपस्थिती होती
अनिल कुपटीकर पुढे बोलतांना म्हणाले की, उद्या द्यावयाचे पाठ कोणते ? त्यातून साधायचे साध्य व तद्‌नुरुप अध्यापन कुशलतेची सांगड यांचा मेळ कसा ठेवायचा याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे सायंकाळी मुलाला जेऊ घालणारी जननी, सकाळी उजळून ठेवलेले ताट पुन्हा नीट व साफ धुतल्याशिवाय जेऊ घालत नाही मग आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याआधी शिक्षकाने स्वतःच्या ज्ञानास उजाळा दिला पाहिजे असा सल्ला शेवटी अनिल कुपटीकर यांनी दिला
प्रारंभी नवनिर्वाचित विद्यार्थी संसद पदाधिकारी यांचे मुख्याध्यापकांनी पुष्पहार देवून कार्याला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी संसद अध्यक्षा कु दिपाली पाचपुते हिने केले सूत्रसंचालन कु प्रिया बहादुरे हिने केले तर उपस्थितांचे आभार कु सुजाता पाटील, कु हर्षला काटकांबळे हिने मानले शिक्षकांनीही आपले विचार मांडले विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे गुणगाव सांगितले कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवराव दुधमल, आशा जोशी, योजना इंगळे, राजेंद्र सुगांवकर, रामराव कोकलेगावकर, बापूराव पांचाळ, विद्या थोरात, मनोहर शिंदे व विद्यार्थी संसद सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास विद्याथी शिक्षक पालक, माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होता