|
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ अंभोरे |
|
|
मुखेड दि७ (प्रतिनिधी) नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी लढ देऊ, असा आशावाद अंभोरे यांनी मांडला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नप अध्यक्ष गणपत गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष केके कांबळे, तहसिलदार प्रविण फुलारी, पोनी नागनाथ कोडे, मारोती गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, विनायक जाधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवकांत मठपती व सचिव माधव बनसोडे, राजेश बंडे, शेखर पाटील, आशिष कुलकर्णी, अनिल शिरसे यांचा यावेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला प्रास्ताविकामध्ये बलभीम शेंडगे म्हणाले कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचा मी आभारी राहीन तसेच यासाठी वेळोवळी सहकार्य करणारे प्रांत अध्यक्ष अंभोरे यांच्यासह अनेक सहकार्यामुळे आपणास सहावा वेतन आयोग लागू झाल्याचे ते म्हणाले की, मुखेड नगरपालिका नवीन इमारतीमध्ये गेल्यानंतर पत्रकार संघासाठी जुनी इमारत द्यावी व गृह बांधणीसाठी पाच हजार एकर जमीन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली तहसिलदार प्रविण फुलारी यांनी सहाव्या वेतन आयोग लागू झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याधिकारी करीम, पोनि नागनाथ कोडे, नगराध्यक्ष गणपत गायकवाड, मारोती गायकवाड सह अनेकांची यथोचित भाषणे झाली यावेळी बाबाराव कदम व शंकर वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी युएम नारलावार, शंकर बेळगे, एस कुचेवाड, अशोक इंद्राळे, शेख अमीर, तेजेराव गायकवाड, कमलबाई गायकवाड, दिगंबर बनसोडेसह अनेक जन सहकार्य केले तर आभार गोविंद तुगीनवार यांनी मानले
|