ग्रामीण बँकेच्या आठमुठी धोरणामुळे शेतकरी वैतागले | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
ग्रामीण बँकेच्या आठमुठी धोरणामुळे शेतकरी वैतागले प्रिंट ई-मेल
किनवट दि७ (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कर्ज वाटप केल्यास ते त्यांच्या हिताचे ठरु शकते पेरणी होऊन दोन महिन्याचा कालावधी होत असतानाही ग्रामीण बँक शाखा उमरी (बा) च्या शाखा व्यवस्थापकाच्या आडमुठी धोरणामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घेवून पेरण्या व शेतीची कामे करावी लागली
अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ होत असल्याने संपूर्ण शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालेच पाहिजे ही मागणी घेऊन कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी कॉ अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन सारखणी येथे छेडले जाणार आहे
दिलेल्या निवेदनात आंदोलकर्त्यांच्या वतीने नमूद केले आहे की, ग्रामीण बँक शाखा उमरी (बा) अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावाच्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप मुदत शिथील करुन ताबडतोब कर्ज वाटपाची व्यवस्था करा, रब्बी पीक कर्ज देण्याची व्यवस्था करा, शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे कागदपत्रे तयार करणे व १ हजार रुपये खर्च करण्यास लावूर कर्ज वाटप न करता फसवणूक करणाऱ्या बँक मॅनेजरची ताबडतोब बदली करा, सदरील मागण्या बँक शाखा वाई बाजार येथील शेतकऱ्यांनाही लागू करा, ओला दुष्काळ जाहीर करा, प्रति एकरी १५ हजार रुपये आर्थिक अनुदान द्या या सर्व मागण्या घेवून जिल्हा सेक्रेटरी कॉ अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतील मुख्य चौकात चक्का जाम आंदालेन १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत छेडले जाणार आहे असल्याचा इशारा दिला आहे