|
जिद्द आणि आत्मविश्वासानेच यशप्राप्ती होते संजय राऊत |
|
|
|
देगलूर दि७ (प्रतिनिधी) युवकांत जिद्द, आत्मविश्वास आणि निर्धार असेल तर जीवनात यशोशिखर गाठता येते, असे प्रतिपादन राऊत अॅकेडमीचे संचालक संजय राऊ यांनी केले देगलूर महाविद्यालयातील विद्यापीठ अनुदान मंडळ पुरस्कृत स्पर्धा परिक्षा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व्याख्यान देताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक वाकोडकर होते प्रारंभी युजीसी समन्वयक प्रा सुनिल देव यांनी या योजनेमागील पार्श्वभूमी विशद केली तर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे संयोजक प्रा संजय देबडे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धा परिक्षा केंद्राचे स्वरुप आणि कार्यप्रणाली यावर विचार मांडले आपल्या उद्घाटनपर व्याख्यानात राऊत पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील युवकांनी आपल्यामधील न्यूनगंड दूर सारुन चिकाटीने अभ्यास करावा आणि स्पर्धात्मक परिक्षेचे अवकाश काबीज करावे स्पर्धा परिक्षेतील कौशल्य अवगत केल्यास यश निश्चित मिळेल, असेही ते म्हणाले ही योजना सुरू करुन या महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाल्याने युवापिढी स्वबळावर जीवनात समर्थपणे उभी राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ वाकोडकरांनी महाविद्यालाने सुरू केलेल्या विविध अशा नविण्यपूर्ण योजनांची माहिती दिली शिक्षक दिनापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी रिमेडिकल कोचिंग क्लासेस ही योजना सुरू करीत असल्याचे सांगितले सूत्रसंचालन डॉ कत्तुरवार यांनी केले तर संजय देबडे यांनी आभार मानले
|