सोन्याच्या आमिषाने लाखोंची लूट करणारी सोनेरी टोळी सप्ताह पासून फरार | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
सोन्याच्या आमिषाने लाखोंची लूट करणारी सोनेरी टोळी सप्ताह पासून फरार प्रिंट ई-मेल
माहूर ,दि७ (प्रतिनिधी) कमी दरात सोने उपलब्ध करुन देण्याचे अमिष दाखवून लूट झाल्याच्या घटनेने परिसरातील व्यापारी व सामान्य नागरिक हादरुन गेले असतांना आरोपी मात्र सप्ताह पासून पोलिसांच्या हाती लागले नाही यावरुन माहूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह लागले असून या घटनेविषयी अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत माहूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शहरातील गुप्तधन खोदणाऱ्या टोळ्यांचा वावर असून देखील उघडकीस आलेल्या एकदोन प्रकरणाखेरीज इतरांचा मात्र दर अमावस्येला वावर चालूर आहे रामगड किल्ला, मातृतीर्थ परिसर भानुनिर्थ परिसर, जुन्या गढ्या व बुरुजावर हजारो खड्डे त्यांची साक्ष देत असून माहूर पोलिस मात्र दिन जाव, तनखा आवच्या भुमिकेत वावरत असून वरिष्ठांचा पण त्यांच्यावर दबाव राहिलेला नाही दि २२ ऑगस्टला परिक्रमा यात्रेच्या गर्दीतच नाट्यमयरित्या आदिलाबाद येथील सराफा व्यापाऱ्याची लूट व तब्बल चार दिवसानंतर लक्ष घातल्याने दाखल झालेल्या दरोड्याचा गुन्हा यामध्ये आरोपीच्या बचावासाठी तर पोलिसांची भूमिका नसावी ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे शिवाय लुटीची रक्कम ५ लाख असून कार्यवाहीचा बडगा दाखवून तर अकडा कमी केला नसावा, ना यात वापरण्यात आलेली गाडी ही दि २१ ऑगस्टच्या रात्री अनुसया मंदिर परिसरातून चोरिस गेली होती त्या गाडभचे काय ओळख पटली, त्या रामेश्वर चव्हाण या मुख्य आरोपी सोबतचे अन्य दहा आरोपी कोणते, नमुन्या दाखल जप्त नाणे गुप्त धनातून मिळाले तर नसावे ना असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात असतांना आरोपीला अटकपूर्व जामीनासाठी मिळत असलेल्या अवधीमुळे न्याय मागत असलेल्या फिर्यादीचे मनोबल खच्चीकरण होत आहे
श्रीक्षेत्र माहूर हे अतिशय पुरातन शहर असून येथील जुन्या वास्तुशेजारी व अनेक प्राचीन ठिकाणी गुप्तधन शोधण्याची प्रकरणे मागे पडली आहेत परिसरातील सोनेरी टोळ्यानी गुप्तधनाच्या शोधात माहूरला अनेक उत्खनन केले असून त्यापैकी काहींना घबाड मिळाल्याचेही चर्चेतून ऐकावयास मिळते शिवाय या तिर्थक्षेत्रात राज्याच्या काना कोपऱ्यातून भक्त दर्शनास येतात अनेक बड्या मंडळीची वाहने यात्रा व नवरात्र उत्सवादरम्यान येतात या पाश्वभूमिवर या दरोड्यातील वाहन चोरी प्रकरण गंभीर आहे माहूर पोलिसांनी ही घटना सहजतेने घेतली असली तरी ही बाब भावीकाळात बाधक ठरु शकते हे विसरता येणार नाही जनतेच्या मनातील संशयकल्लोळ पोलिसांच्या तर राजरोसपणे पोलिसांच्या नाकावर टिच्चुन शेकापूर येथील मुख्य आरोपीस गजाआड करुन सह आरोपी, मागच्या रक्कमेतील रहस्य पोलिसांनी प्रकाशात आणावे लागेल तरच माहूर पोलिसांची प्रतिमा परत एकदा उजळू शकेल अन्यथा येरे माझ्या मागल्या आहेच