सागवान तस्करांना रोखण्यासाठी वनविभाग हतबल | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
सागवान तस्करांना रोखण्यासाठी वनविभाग हतबल प्रिंट ई-मेल
किनवट, दि ७ (प्रतिनिधी) वनविभागाने अवैध सागवान तस्कराविरुद्ध चालविलेल्या मोहिमेमुळे घाबरलेल्या सागवान तस्करांनी आता चक्क वनकर्मचारी अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करुन कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करत असल्यामुळे नक्षलग्रस्त, आदिवासी, अतिदुर्गम किनवट तालुक्यातील वनकर्मचाऱ्यांच्या खच्चिकरण होत आहे अवैध सागवान तस्करीविरुद्ध कारवाई करण्यास कर्मचारी घाबरु लागल्यामुळे तालुक्यातील संघटीत सागवान तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे
किनवट तालुका मौल्यवान वनसंपती मोठ्या प्रमाणात असून याची तस्करी करण्यासाठी तस्करांनी संघटीतपणे मोठ्या प्रमाणात सागवानाची तस्करी चालविली आहे या तस्करीला रोखण्यासाठी वनविभागाने आपल्या तोकड्या कर्मचाऱ्यांसह तथा निशस्त्र मोहीम राबवित आहेत या मोहिमेदरम्यान गेल्या महिन्यात वनविभागाची चार अॅटो, सायकलीसह लाखो रुपयांचा अवैध सागवान पकडला या प्रकारामुळे घाबरलेल्या संघटीत वनतस्करांनी लोकप्रतिनिधीचा आधार घेत तस्कराविरुद्ध कारवाई करीत असलेल्या वनकर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासाठी दबावतंत्र वापर करत आहेत मांडवी वनविभागाने निराळा तांडा येथे दोन आरोपींना मुद्येमालासह पकडून अटक केल्यामुळे या संघटीत वनतस्कारांनी आपल्या हस्तकाकरवी लोकप्रतिनिधींची निशाभूल करुन चक्क वनकर्मचाऱ्यांच्याच निलंबनासाठी वरिष्ट अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत असल्यामुळे तालुक्यातील वनकर्मचाऱ्यांनी सामुहिक बदलीची मागणी करीत आहेत या प्रकारामुळे अवैध सागवान तस्करांची तस्करीत संघटीतपणे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे वनकर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींनी अशाच दबावतंत्राचा वापर केला तर या तालुक्यातील उरलीसुरली नैसर्गिक सागी वनसंपत्ती नामशेष होईल, अशी भिती आम नागरिकांतून व्यक्त केली जात आहे
दरम्यान किनवट वनक्षेत्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोरी चोरी चुपके चुपके पद्धतीने सागवान लाकडाची तस्करी होऊ लागली आहेयाला आळा घालण्यासाठी वनविभागाने ठोस धोरण आखणे गरजेचे आहे, अशी मागणी वनप्रेमींकडून होत आहे