बितनाळ येथे दोन गटात हाणामारी | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
बितनाळ येथे दोन गटात हाणामारी प्रिंट ई-मेल
उमरी, दि७ उमरी तालुक्यातील बितनाळ येथील दोन कुटुंबातील जुन्या अंतर्गत वादात आज दि७ रोजी सकाळी ७ वाहाणामारी झाली यात नऊ लोकांना मार लागले असून त्यांना उमरीच्या ग्रामीण रुगणालय येथे प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यातील सात ज्यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले एकमेकांच्या विरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन उमरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
यामध्ये साईनाथ विठ्ठल घोसलवाड वय २८, बालाजी घोसलवाड ३५, दत्तहरी कानगुलवार ३०, मारोती कानगुलवार २५, माहादू कानगुलवार, विठ्ठल कानगुलवार २२, पोसानबार्ठ कानगुलवार ४५ यांना डोक्यात मार असल्याने नांदेडला पाठवण्यात आले तर पोतन्ना घोसलवार ३६, रेणुका घोसलवाड ३५ उमरीमध्ये प्रथम उपचार करुन पाठवण्यात आले आहे
गेल्या दोन दिवसांखाली घोसलवाड व कानगुलकर या दोन कुटुंबात भांडण होऊन एकमेकाविरुध्द गुन्हे दाखल झाले होते त्याचाच मनामध्ये राग वाढत जाऊन आज पुन्हा सकाळी ७ वाशौचालयास गेल्याने एकमेकांत तुब्बळ हाणामारी झाल्याने एकमेकांचे डोके फोडून घेतले आहे
सदरील दिलेल्या फिर्यादीवरुन एकमेकाविरुध्द कलम १४३,१४७,१४८, १४९,३२३, ३२४, ३२६ भादवि कलम १३५ जमावबंदी प्रमाणे दोघा विरुध्दच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोनिअशोक मैराळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपनिरिक्षक सुसर हे करीत आहेत