|
विद्यार्थ्यांनी फुलविली माळरानावर हिरवळ |
|
|
रोपळे ब्रु, दि७ वर्षानुवर्षे ओसाड माळरान असलेलया मेंढापूर तापंढरपूर येथील वनक्षेत्रावर न्यू इंग्लिश स्कूलतर्फे ‘हरित सोलापूर’ अभियानातून विविध प्रकारच्या फळाफुलांच्या साडेसहा हजार वृृक्षांची लागवड करण्यात आली आणि ओसाड माळरानाला हिरवाईचा एक वेगळाच साज मिळाला लावण्यात आलेली रोपं मोठी होईपर्यंत त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी येथील विद्यार्थ्यांनी घेतली वन विभाग, सामाजिक वनीकरण व रावळे बुुद्रूक ग्रामस्थांच्या सहकार्याने वनमहोत्सव व हरित सोलापूर या उपक्रमा अंतर्गत वृक्षलागवड मोहिम राबविण्यात आली न्यू इंग्लिश स्कूलने त्यामध्ये पुढाकार घेतला वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी नऊ वाजता रोपं लावण्यासाठी खुरपे, फावडे, टिकाव घेऊन सर्व विद्यार्थी माळरानावरील वनक्षेत्रावर जमा झाले रोपांची पूजा, वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन विद्यार्थी रोपं लावण्यासाठी सरसावले आठशे विद्यार्थ्यांनी दिवसभरात साडेसहा हजार रोपं लावली रोपांच्या अवतीभोवती बसून दुपारच्या मधल्या सुटीत घरातून आणलेला डबा खावून विद्यार्थी व शिक्षकांनी वनभोजनाचा आनंद लुटला मान्यवरांच्या हस्ते सोमवारचे औचित्य साधून बेलाच्या झाडाची रोपे लावून वृक्षलागवडीला प्रारंभ केला प्रास्ताविकात मुख्याध्यापक एमजेचाेैधरी यांनी कार्यक्रमात सहभाग घेवून रोपांचे चांगले संवर्धन करणार असल्याचे सांगितले पर्यवेक्षक पीडीयादव, वैशाली व्यवहारे, कुमार सुरवसे, आरएलकोरे, डीडीगाडवे, एमएमशिवशरण, एचएसकेंदुळे, एमडीगायकवाड, व्हीपीहिरके, एमव्हीथिटे, पीएनझेंडे, आरएलपवार, आरसीमांडरे, एएभोसले, पीएसकोळेकर, एजीपवार, व्हीएसअजगरे, डीएमकदम आदी शिक्षक व वनपाल एमएमस्वामी, वनरक्षक एचआरफुले, वन मजूर डीयुमुलाणी, पीबीउबाळे, बीव्हीपवार, बीव्हीपाटील यांचेही सहकार्य मिळाले
|