|
जिल्ह्यातील नऊ खेळाडू मुंबईत बेमुदत उपोषण करणार |
|
|
परभणी, दि७ पोलिस शिपाई भरतीत खुल्या गुणवत्ता यादीत निवड झालेली असतांनाही नोकरीपासून वंचित राहिलेले परभणी जिल्ह्यातील नऊ खेळाडू हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनापासून दि१७ सप्टेंबर पासून मुंबई येथे बेमुदत उपोषण करणार आहेत या प्रकरणी परभणी पोलिस शिपाई भरतीत खुल्या गुणवत्ता यादीत असलेले खेळाडू प्रीती दुधवडे, प्रमिला गवळी, नंदू आंधळे, विजयमाला रिठठे, ओमप्रकाश वाघ व राखीव पोलिस दलाच्या गुणवत्ता यादीत आलेले अशोक पवार, गणपत राठोड व संदीप नलवाड या खेळाडूंनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बेमुदत उपोषणाच्या इशाऱ्याचे निवेदन पाठवले आहे पुणे येथील क्रीडा संचालनालयाच्या संचालकांनी दिलेल्या चुकीच्या अभिप्रायाचे आम्ही बळी ठरलो असल्याचे निवेदनात म्हटले आहे विविध ठिकाणाच्या पोलिस शिपाई भरतीत आमची निवड गुणवत्तेनुसार झाली आहे, असे असतांनाही संचालकांच्या चुकीच्या अभिप्रयामुळे आम्हाला नोकरीपासून वंचित ठेवले आहे गृह विभागाच्या दि१६ मे २००६ च्या आदेशान्वये पोलिस शिपाई पदासाठी असणारी खेळाडूबाबतची पात्रता आम्ही पूर्ण केली आहे पण अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या सांघिक चेळात भाग घेतला तर अपात्र व वैयक्तिक खेळात भाग घेतला तर पात्र असे चुकीचे अभिप्राय संचालकांनी दिले आहेत क्रीडा संचालकांकाडे या स्पर्धांचा दर्जा व खेळाडूंविषयी कुठलीच माहिती नसतांनाही त्यांनी हे लेखी आदेश दिले आहेत त्यामुळे विद्यापीठाच्या अनेक खेळाडूंना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे या प्रकरणी राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, कार्यकारिणी सदस्य मंगल पांडे, राज्यमंत्री फौजिया खान यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे असे असतांना संचालनालय खेळाडूंवर अन्याय करीत आहे न्याय न मिळाल्यास दि१७ सप्टेंबर पासून सकाळी आठ वाजल्यापासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे
|