तेरेसा यांच्या सन्मानार्थ अमेरिकेत टपाल तिकीट | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
तेरेसा यांच्या सन्मानार्थ अमेरिकेत टपाल तिकीट प्रिंट ई-मेल
मुंबई, दि७ मानवतेचा वसा घेऊन पाच दशके समाजसेवा करणाऱ्या मदर तेरेसा यांच्या सन्मानार्थ अमेरिकेने त्यांच्यावर टपाल तिकिट काढले आहे बासिलका येथे या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले
मदर तेरेसा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारताने त्यांच्यावर नुकतेच पाच रुपयांचे नाणे काढले आहे अमेरिकेनेही मदर तेरेसा यांच्या समाजसेवेच्या गौरवार्थ टपाल तिकीट काढले असून त्यांची किंमत ४४ सेंट आहे यूएस पोस्टल सर्व्हिसच्या वतीने काढण्यात आलेल्या टपाल तिकिटावर प्रसिध्द चित्रकार थॉमस ब्लॅकशेयर, दुसरे यांनी रेखाटलेले तेरेसा यांचे चित्र आहे प्रकाशन सोहळ्यास ब्लॅकशेयरी उपस्थित होते
या प्रसंगी पोस्टमास्तर जनरल जॉन पॉटर म्हणाले की, साधारणतः तिकिटांना देशाचे कॉलिंग कार्ड मानले जाते कारण ते स्थानिक आण आंतरराष्ट्रीय लोकांपर्यंत पोचत असते १९९६ साली तेरेसा यांना अमेरिकेचे सन्माननीय नागरिकत्व बहाल केल्यानंतर त्यांच्यावर टपाल तिकीट काढणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब होय असे म्हणाले