माळी समाजाच्यावतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
माळी समाजाच्यावतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन प्रिंट ई-मेल
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) अभारतीय माळी महासंघाच्यावतीने रविवार दि७ फेब्रुवारी २०१० रोजी सकाळी १० वाजता श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, वसरणी येथे नांदेडउत्तरचे नवनिर्वाचित आमदार डीपीसावंत राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅडराजीव सातव यांचा भव्य सत्कार व एक दिवसीय राज्यस्तरीय माळी समाज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव लिंगे हे भुषविणार आहेत तर प्रशिक्षण शिबीराचे उद्‌घाटन आअॅडराजीव सातव हे करणार आहेत या शिबीराचा हेतू माळी समाजातील प्रत्येक कार्यकर्ता व समाज बांधव, भगीणी जागरूक करून फुलेशाहूआंबेडकर विचार धारेचा बनविणे हा आहे कार्यकर्ता प्रशिक्षित, जागृत व अभ्यासू असेल तरच समाजाचे कार्य जास्त प्रभाविपणे होऊन समाज सुधारणा सर्वांगिण होण्यास मदत होते असा संयोजकाचा हेतू हे शिबीर आयोजित करण्याचा आहे या शिबीरात अॅडराजीव सातव यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे तसेच अॅडसंभाजी पगारे (राष्ट्रीय अध्यक्ष, अभामाळी महासंघ), माजी मंत्री सुधाकर गणगणे, प्राश्रावण देवरे (नाशिक), तारका विवरेकर, विलास पाटील यांचे विविध पैलूवर सविस्तर प्रशिक्षणपर मार्गदर्शन होणार आहे हा सत्कार समारंभ व शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रागणपत राऊत, रामचंद्र रासे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी शिंदे, माणिकराव शिंदे, रामचंद्र सावंत, सखाराम शितळे सदाशिव अंबुरे, रामचंद्र सावंत, सखाराम शितळे, प्रावसंत गोरे, ज्ञानेश्वर शिंदे, अभिषेक लुटे, शाहिर नागोराव गुरूनुले, गजानन रासे, यांच्याशी संपर्क साधावा