मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता बँकेमार्फत शिष्यवृत्ती | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता बँकेमार्फत शिष्यवृत्ती प्रिंट ई-मेल
नांदेड, दि५ (प्रतिनिधी) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आता राष्ट्रीयकृत बँकेमार्फत अदा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क या योजनेची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे मुंबई उपनगर येथे १ फेब्रुवारी तर इतर जिल्ह्यात १ मार्च २०१० पासून ही पद्धत लागू होणार असल्याने सर्व संबंधित महाविद्यालयांना २५ फेब्रुवारी २०१० पर्यंत कोअर बॅकींगची सुविधा उपलब्ध असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडण्याबाबत सूचित केले आहे महाविद्यालयांनी चेक ऐवजी सीबीएस/ईसीएस प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीचे वाटप ३१ मार्च २०१० पूर्वी पूर्ण करावे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे ३० जून २०१० पर्यंत बँकेत खाते उघडावे १ जुलै २०१० पासून सीबीएस/ईसीएस द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्येच शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी
१ जुलै पासून जोपर्यंत या बाबतचे सॉफ्टवेअर तयार होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर महाविद्यालयाकडून सीबीएस/ईसीएस मार्फत शिष्यवृत्तीचे पैसे जमा करण्यात येतील सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्तीचे पैसे जमा केले जातील
जी राष्ट्रीयकृत बँक विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्याचा संदेश एसएमएस मोफत पाठवेल तसेच विद्यार्थ्यांचे शुन्य शिलकीचे झीरो बॅलन्स खाते उघडण्यास तयार असेल अशाच राष्ट्रीयकृत बँकेस प्राधान्य द्यावे असे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे