वैज्ञानिक दृष्टीकोन अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अत्यंत आवश्यक डॉ दाभोळकर | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
वैज्ञानिक दृष्टीकोन अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अत्यंत आवश्यक डॉ दाभोळकर प्रिंट ई-मेल
नांदेड दि १ (प्रतिनिधी) उत्क्रांतीत मानवाच्या मेंदूचा विकास होत गेला त्यामुळेच मानव प्राणी इतर प्राण्यापेक्षा अत्यंत हुशार झाला बुद्धीमान मानव प्राणी आपल्या मेंदूच्या विकासामुळे विज्ञानात प्रचंड प्रगती करु शकला असे असले तरी अजुनही मोठ्या प्रमाणात लोक अंधश्रद्धेवर श्रद्धा ठेवणारे आहेत
अजुनही तरुण मुले लग्न ठरवतांना कुंडली पाहतात हे योग्य नाही बुवागिरीवर आपले भाष्य करताना ते म्हणाले, हवेतून विभूती काढणे, हवेतूनच सोन्याची अंगठी व चैन काढणे व भक्तांच्या कॅटेगिरी प्रमाणे देणे हि एक निव्वळ फसवेगिरी आहे
भानामती, करणी, जादूटोणा, अघोरी उपचार, मंत्रतंत्र टाळण्यासाठी अंधश्रद्धेवरील विश्वास कमी केलाच पाहिजे असे मत डॉ दाभोळकरांनी व्यक्त केले यासाठी योग्य तो कायदा होणे अत्यंत निकडीचे आहे
डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हस्ते फिजीकल केमिस्ट्री प्रयोगशाळेतील मल्टीमेडिया फॅसीलिअीचे उद्‌घाटन करण्यात आले
अध्यक्षीय समारोपात बोलतांना नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी जादूटोणा विरोधी कायदा करणे अत्यंत महत्वाचे आहे, असे अग्रही मत व्यक्त केले
सभेचे सूत्रसंचालन डॉ एलपी शिंदे यांनी केले महाविद्यालयाविषयी माहिती प्राचार्य डॉ जीएम कळमसे यांनी करुन दिली विभागप्रमुख डॉ एमएन देशपांडे यांनी डॉ डीएम देशपांडे व्याख्यानमालेचे प्रास्ताविक केले तर डॉ पीपी शर्मा यांनी आभार व्यक्त केले
कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमास अनिसचे कार्यकर्ते व प्राध्यापक उपस्थित होते