शिवसेनेतर्फे शांतीधाम स्मशानभूमीसाठी तीस क्विंटल लाकडाची मदत | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
शिवसेनेतर्फे शांतीधाम स्मशानभूमीसाठी तीस क्विंटल लाकडाची मदत प्रिंट ई-मेल
नांदेड, दि १ (प्रतिनिधी)ः अत्यंसंस्कारासाठी अतिशय माफक दरात अंत्यविधीचे सामान पुरविणाऱ्या शांतीधाम ट्रस्टला शिवसेनेतर्फे अॅड दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून तीस क्विंटल लाकुड देण्यात आले
गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीची अतिशय चांगली अवस्था शांतीधाम ट्रस्त मार्फत करण्यात येते शांतीधाम ट्रस्ट स्थापन होण्यापूर्वी या घाटाची अवस्था अतिशय दुरवस्था होती अंत्यविधीसाठी लागणारे सामान अव्वाच्या सव्वा दराने विकण्यात येत होते शांतीधाममुळे सर्वच परिस्थिती बदलली बेवारस प्रेतांना अग्नी देण्याचे काम निःशुल्कपणे केले जाते अंत्यविधीसाठी लागणारे, जळावू लाकूड शिवसेनेतर्फे शहरप्रमुख अॅड दिलीप ठाकूर यांनी ट्रस्टला उपलब्ध करुन दिले संजय लोया यांनी या कामी विशेष सहकार्यक केले शांतीधाम ट्रस्टचे व्यवस्थापक सुनिल कांबळे यांच्या सुपूर्द ही लाकडे करण्यात आली
यावेळी माजी पंस सदस्य व्यंकोबा येडे पाटील, संदिप छप्परवाला, हरिभाई मेहता, संजय लोया, शेखर अंबारे, राज ठाकूर, विलास कदम, रोहित छप्परवाला हे उपस्थित होते दानशूर नागरिकांनी शांतीधाम ट्रस्टला अंत्यविधीसाइी लागणारे साहित्य देवून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन शहर प्रमुख अॅड दिलीप ठाकूर यांनी केले आहे