|
रासपाच्या वर्धापण दिनानिमित्त रक्तदान शिबीर; ६२ तरुणांनी केले रक्तदान |
|
|
नांदेड, दि १ (प्रतिनिधी)ः राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अंबाजोगाई येथे दिनांक २९ ऑगस्ट रोजी पक्षाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमात रक्तदान शिबीर घेण्यात आले, या शिबिरात ६२ तरुणांनी सहभाग नोंदविला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांना कार्यकर्त्यांच्या वतीने १२ लाखाची टाटा सफारी गाडी भेट देण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष रासपाचे आ बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय नेते महादेव जानकर, रासपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पुंडलिक मामा काळे यांची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महादेवजी जानकर म्हणाले, आपल्या पक्ष शोषीतांचा पक्ष असल्याने तळागाळातील माणसापर्यंत जावून काम करावे लागते, त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेचे आणि शेतकऱ्यांचे, मजुरांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे, प्रतिपादन जानकर यांनी केले रासपाचे आ बाबसाहेब पाटील म्हणाले सभासद नोंदणी कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी सक्रीय भाग घेवून आपापल्या मतदान संघात, सभासद वाढवावे तसेच, पक्षाचे मुखपत्र विश्वाचा यशवंत नायकचे प्रत्येकानी सदस्य बनावे तरच आपला पक्ष मजबुत बनण्यास मदत होईल असे आवाहन बाबासाहेब यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन रासपाचे मराठवाडा संपर्क प्रमुख बाळासाहेब दोडतले यांनी केले
|