गोपाळकाला दहीहंडीची सर्वत्र धूम | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
गोपाळकाला दहीहंडीची सर्वत्र धूम प्रिंट ई-मेल
नांदेड दि १ (प्रतिनिधी) आज शहरात अनेक ठिकाणी ‘माखनचोर’ दहीहंडीतील माखन चोरुन खाण्यासाठी उत्सुक झाले आहेत दहीहंडी फोडण्यासाठी आज अनेक मंडळामध्ये चुरस रंगणार आहे तर अनेक बड्या लोकांकडून यावर्षी हजारोंची बक्षिसे जाहीर करण्यात आल्याने यामधील उत्सुकता अधिकच वाढली आहे
गोकुळाष्टमी म्हटलं की, श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर धुकधडाक्यात साजरा केला जातो या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दहीहंडीचे आयोजन, त्यामुळे कित्येकदिवस अगोदरपासून सर्व दहीहंडी मडळातर्फे यासाठी सराव केला जातो
मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात तर महिलावर्गही यामध्ये धडाडीने भाग घेताना दिसतात आपल्या इकडे याचे प्रमाण कमी असले तरी येणाऱ्या काळात महिलांमुली या उत्सवात सहभागी होतील असे दिसत आहे यावर्षी मुख्य कारण शहरात दहीहंडी चे अनेक बड्या मंडळींनी आयोजन केले आहे यासाठी शहरातील चौका चौकात मोठमोठी बॅनर्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत बक्षिसे जाहीर करण्यात आल्याने यातील चुरस वाढणार असल्याचे दिसत आहे शहरात अनेक ठिकाणी राजकीय पक्षातर्फेही यंदा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे
जुना मोंढा, गाडीपूरा, सराफा, चौफाळा, सिद्धनाथपुरी आदी भागातील दहीहंडीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते तर यावेळी सर्व नागरिक उत्सव पाहण्यासाठी गर्दी करतात चौफाळा, सिद्धनाथपुरी या ठिकाणी तर दहीहंडीच्या उत्सवाला जत्रेचे स्वरुप येते शहरातील अनेक दहीहंडी मंडळे या ठिकाणी सहभागी होत असतात
यावेळी चौकात मोठी आकर्षक रांगोळी काढण्यात येते त्यानंतर उंच ठिकाणी दहीहंडीचे रंगवलेले मडके बांधण्यात येते सर्वाचा श्वास रोखुन दहीहंडी लोक उत्सुकतेने पाहतात यामध्ये मोठमोठ्या ढोल ताशे वाजवून मंडळाचे मनोबल वाढविण्याल्या जाते त्यांना प्रोत्साहीत केले जाते अशाप्रकारे श्रीकृष्णाच्या जन्मउत्सव साजरा केल्यानंतर दहीहंडीचा लोकोत्सव हा उत्सुकतेचा व आकर्षणाचा भाग दिसून येतो त्यामुळेच आता सर्व तरुणाई दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली असून ‘हाथीघोडा पालखी, जय कन्हैया लाल की’ चा गजर करीत लहान मुलांसह तरुणाई दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक झाली आहे, हे नक्की