|
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यास अडीच हजारांची लाच घेतांना पकडले |
|
|
नांदेड,दि१ (प्रतिनिधी) शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने शाळेला भेट देवून पडताळणीचा अहवाल वरिष्ठांना चांगला देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे अडीच हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती सदर रक्कम विस्तार अधिकाऱ्याने घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले अधिक माहिती अशी की, रावसाहेब हिरामन जाधव मुख्याध्यापक सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल मुदखेड यांच्याकडे शिक्षण विस्तार अधिकारी शिरीषकुमार रामराव आळंदे यांनी अडीच हजार रुपयाची मागणी केली होती शिरिषकुमार आळंदे यांनी १० ऑगस्ट रोजी सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलला भेट दिली होती सदर भेटीचा अहवाल वरिष्ठांना चांगला देण्यासाठी आळंदे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती या प्रकरणी मुख्याध्यापक जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती आज दि ०१ सप्टेंबर रोजी दुपारी ३५० वाजता कमल टी हाऊस पावडेवाडी नाका येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन शिक्षण विस्तार अधिकारी आळंदे हे रावसाहेब हिरामन जाधव यांच्याकडून अडीच हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले एसीबीचे पोलिस अधीक्षक सुभाष बुरसे, पोलिस उपअधीक्षक संग्राम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपअधीक्षक मोळवणे, पोनि पन्हाळे, पोनि अशोक कदम, पोहे शिंदे, कदम, जोशी, खामणे, गायकवाड, कोडगीरे यांनी ही कारवाई केली
|